Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दहा महिन्याच्या मुलीवर सांडल गरम पाणी अन घडल धक्कादायक
    क्राईम

    दहा महिन्याच्या मुलीवर सांडल गरम पाणी अन घडल धक्कादायक

    editor deskBy editor deskNovember 17, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : प्रतिनिधी 

    राज्यात हिवाळी सुरु असतांना प्रत्येक परिवार गरम पाण्याने अंघोळ करीत असतो पण हेच गरम पाणी घेणे एका परिवारावर बेतले आहे. दहा महिन्यांच्या चिमुकलीवर गरम पाणी सांडलं आणि त्यात ती प्रचंड होरपळली. यातच तिचा जीव जाण्याची घटना घडली आहे. गंभीररीत्या भाजलेल्या दहा महिन्यांच्या कोवळ्या जीवावर तीन दिवस उपचार सुरु होते. पण तिची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरलीय. या चिमुकलीच्या मृत्यूने तिच्या आईवडिलांना मोठा धक्काच बसलाय. चिमुकलीच्या मृत्यूबाबत कळताच तिच्या आईवडिलांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा घटना नाशिकमध्ये घडली आहे.

    नाशिक येथील गंगापूर नाका भागात ही धक्कादायक घटना घडली. आवेरा शुभम इंगळे ही अवघ्या दहा महिन्यांची चिमुकली. आवेराच्या जन्माने इंगळे कुटुंबात आनंद संचारला होता. चिमुकल्या आवेराने घरात किलबिलाट झाला होता. पण नियतीच्या मनात वेगळंच होतं.आवेरा इंगळे या चिमुकलीच्या अंघोळीसाठी पाणी गरम करण्यात आलं होतं. हे अंघोळीसाठीचं कडकडीत गरम पाणी बाथरुममध्ये काढून ठेवलं गेलेलं. पण याच गरम पाण्याने आवेराचा घात गेला.बाथरुममध्ये काढून ठेवलेलं गरम पाणी आवेराच्या अंगावर सांडलं आणि अनर्थ घडला. आवेरा अंगावर गरम पाणी सांडल्यामुळे प्रचंड भाजली गेली. तिचं कोवळं शरीर गंभीररीत्या जखमी झालं. गरम पाण्याने काळीज पिळवटून टाकावा असा आक्रोश आवेराने केला. तिच्या रडण्याच्या आवाजाने घडलेला प्रसंग लगेचच कुटुंबीयांच्या लक्षात आला.इंगळे कुटुंबीयांनी आवेराला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. तिच्यावर उपचार सुरु होते. आवेराचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांकडून प्रयत्नांची शर्थ केली जात होती. दरम्यान, मृत्यूशी सुरु असलेली आवेराची झुंज अधिकच कठीण होत गेली होती. तीन दिवस दहा महिन्यांची आवेरा मृत्यूशी झुंजली. पण तिची झुंज अखेर अपयशी ठरली. मंगळवारी तिने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.