Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मला ईडीने केली होती अटक पण…; राऊत यांनी ठाकरेंना लगावला टोला
    Uncategorized

    मला ईडीने केली होती अटक पण…; राऊत यांनी ठाकरेंना लगावला टोला

    editor deskBy editor deskNovember 10, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    तब्बल १०३ दिवसांनंतर जेलमधून बाहेर येणारे शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पहिल्यांदाच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं ”हो केली मला अटक ईडीने आणि ती बेकायदेशीर होती, असे म्हणत त्यांनी राज ठाकरे यांना हि टोला लगावला आहे.

    ”जेलमध्ये असतांना मी पेपर वाचायचो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या काळामध्ये काही चांगले निर्णय घेतले आहेत. विशेषतः गरीबांना घर देण्यासंदर्भात आणि ‘म्हाडा’ला अधिकार देण्यासंदर्भात फडणवीस यांनी घेतलेले निर्णय कौतुकास्पद आहेत.” असं म्हणत सध्या राज्याचा कारभार उपमुख्यमंत्रीच चालवतात, असं संजय राऊत म्हणाले.

    दरम्यान, आपण दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांची भेट घेऊन आपल्यासोबत काय घडलं, ते सांगणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याबरोबच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीदेखील भेट घेणार असल्याचं राऊतांनी सांगितंल.

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल बोलतांना संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरेंनी एका भाषणात माझ्यावर टीका केली होती. मला ईडीकडून अटक होणार, त्यामुळे मी स्वतःशीच बोलण्याची प्रॅक्टिस करावी, असं ते म्हणाले होते. ”हो केली मला अटक ईडीने आणि ती बेकायदेशीर होती. परंतु शत्रूबद्दलही असं बोलू नये. सावरकर, टिळक ज्याप्रमाणे एकांतात होते, त्याप्रमाणे मीही एकांतात होतो. माझी अटक राजकीय होती. मी माझा एकांत सत्कारणी लावला आहे.” असं संजय राऊत म्हणाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पाळधीत मोठी दुर्घटना! स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी, २ गंभीर

    March 16, 2026

    बचत खात्यात शिल्लक कमी? दंडाबाबत मोठी माहिती समोर

    March 11, 2026

    प्रशासकीय राजवटीतील निर्णयांवर श्वेतपत्रिका जाहीर करा नगरसेविका वैशाली अमित पाटील

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.