Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ४५ हजार महिलांना मिळणार रोजगार ; टाटा समूहाची घोषणा
    शैक्षणिक

    ४५ हजार महिलांना मिळणार रोजगार ; टाटा समूहाची घोषणा

    editor deskBy editor deskNovember 2, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    जवळपास २०० पेक्षा जास्त मोबाईल कंपन्या त्यांचे फोन तयार करत आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जगातील सर्वात मोठी मोबाईल फॅक्टरी भारतात आहे, जी फक्त सॅमसंगची आहे. देशात मोबाईलचे उत्पादन होत असले तरी त्याचे सुटे भाग आणि कच्च्या मालासाठी चीन किंवा तैवानवर अवलंबून राहावे लागते. आता टाटा समूह ही साखळी तोडण्याच्या तयारीत आहे.

    काही महिन्यांपूर्वी अशी बातमी आली होती की टाटा समूह भारतात मोबाईल पार्ट्स तयार करेल आणि आता असे वृत्त आहे की टाटा समूह मोबाईल पार्ट्स फॅक्टरीसाठी 45,000 लोकांची भरती करण्याच्या तयारीत आहे. आयफोनचे पार्ट्स सर्वप्रथम टाटाच्या कारखान्यात तयार केले जातील. तामिळनाडूतील होसूर येथे असलेल्या टाटा समूहाच्या प्लांटमध्ये पुढील १८ ते २४ महिन्यांत ४५ हजार महिला कर्मचाऱ्यांना नियुक्त केले जाईल. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, कारखान्यात सध्या 10,000 कामगार आहेत, बहुतेक महिला आहेत.
    होसूर येथील टाटा समूहाचा कारखाना ५०० एकरांवर पसरलेला आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये, आदिवासी समाजातून आलेल्या 5,000 महिलांना या प्लांटमध्ये नोकऱ्या मिळाल्या. या संदर्भात टाटा समूहाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा अॅपलने अद्याप कोणतीही पुष्टी केलेली नाही. या प्लांटमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना 16 हजार रुपये मासिक वेतन मिळणार आहे. याशिवाय राहण्याची व भोजनाची व्यवस्थाही मोफत करण्यात आली आहे. या महिलांच्या शिक्षणाचा खर्चही टाटा समूह उचलणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भागपूर उपसा सिंचनासाठी शासनाकडून २५० कोटींची मंजुरी !

    March 16, 2026

    बोर्ड परीक्षेत कॉपीचा मोठा भंडाफोड; सीसीटीव्हीमुळे 81 जणांवर कारवाई

    March 9, 2026

    नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती – पालकमंत्री गुलाबराव पाटील

    March 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.