Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धक्कादायक : १८ वर्षीय तरुणाचा खून
    क्राईम

    धक्कादायक : १८ वर्षीय तरुणाचा खून

    editor deskBy editor deskOctober 14, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी

    एकमेकाकडे पाहण्याच्या शुल्लक कारणावरून वाद घालत शिवीगाळ करीत लोखंडी रॉडने मारहाण झाल्याने एक १८ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    चाळीसगाव  तालुक्यातील वाघळी येथे दि,१२ रोजी एकमेकांकडे बघण्याच्या शुल्लक कारणावरून पाच जणांनी एका तरुणाचा चाकूने खूपसून खून केल्याची घटना घडली आहे. तर घटनेत भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या मयताचा काका देखील जखमी झाला आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत पाच पैकी काही आरोपींना ताब्यात घेतले. या घटनेनतंर गावात तनावाचे वातावरण असल्यामुळे रात्रीच पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

    बुधवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सय्यद मुसा खाटीक याच्यासह काही तरुणांनी  गावातीलच मोहन विजय हाडपे (वय १८) या तरुणाला गावात असलेल्या व्यायाम शाळेजवळ एकमेकाकडे पाहण्याच्या शुल्लक कारणावरून वाद  घातला. व शिवीगाळ करीत लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली.

    मोहन हडपे याचे काका रवींद्र भास्कर हडपे या ठिकाणी भांडण सोडविण्यासाठी आले असता. त्याला देखील चार ते पाच जणांनी रॉड डोक्यात घालून दुखापत केली. तर चाकूने मोहनच्या पोटावर सपा-सप वार केले आहे. यात तो गंभीर जखमी झाला. मोहन यास उपचारासाठी चाळीसगाव येथे नेत असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. तर काका रवींद्र हाडपे यांना जखमी अवस्थेत येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

    पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांचा ताफा वाघळी गावात दाखल झाला या घटनेतील तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून यातील एक संशयित आरोपी हा अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येते. याप्रकरणी जखमी रवींद्र भास्कर हाडपे यांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसात गुन्हा रजिस्टर नंबर ४९३/२२ कलम ३०२, ३०७, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, १०९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. या प्रकरणी कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन चाळीसगाव पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    २४ तासांत चोरीचा पर्दाफाश : जळगाव पोलिसांची झटपट कारवाई !

    April 18, 2026

    राज्यात उष्णतेचा कहर, अवकाळी पावसाचा तडाखा : दुहेरी संकटात शेतकरी-नागरिक हैराण

    April 18, 2026

    धक्कादायक : मास्टर कॉलनी तरुणाने संपविले आयुष्य !

    April 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.