Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धावत्या बसने घेतला पेट : बसचा अक्षरश: कोळसा, १० प्रवाशांचा मृत्यू
    क्राईम

    धावत्या बसने घेतला पेट : बसचा अक्षरश: कोळसा, १० प्रवाशांचा मृत्यू

    editor deskBy editor deskOctober 8, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : वृत्तसंस्था

    नाशिक ते औरंगाबाद मार्गावर हॉटेल मिरचीजवळ एका खासगी बसचा मोठा अपघात झाला. या अपघातात 10 प्रवाशांचा मृत्यू झालाय तर 38 प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. दरम्यान, पूर्ण बस पेटलेली असताना प्रवासी खिडक्यांमधून उड्या मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. शनिवारी पहाटे 4 वाजून 20 मिनिटांनी हा अपघात झाला आहे.

    चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस यवतमाळहून मुंबईच्या दिशेने निघाली होती. प्राथमिक माहितीनुसार ही खासगी बस आणि एका आयशर टेम्पोमध्ये अपघात झाला. प्राथमिक तपासानुसार, बस आणि ट्रकमध्ये 90 अंशाच्या कोनात धडक झाली. चौक ओलांडत असताना धावत्या बसची समोरून येणाऱ्या ट्रकला धडक बसली. त्यामुळे बसच्या डिझेल टँकचा स्फोट होऊन आग लागली. बसमधील लोकांना बाहेर पडायला मार्ग नव्हता. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे चार ते पाच बंबांनी त्या ठिकाणी धाव घेतली. यानंतर आग विझविण्याचे प्रयत्न सुरू झाले. तब्बल 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली. नाशिक सिटी लिंक बस सेवेच्या माध्यमातून जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत आहे. जखमींवर उपचार सुरू झाले आहेत. प्रवासी गाढ झोपेत असताना अचानक आवाज झाला आणि सर्व प्रवाशी जागे झाले, मात्र बसच्या अनेक भागात आग पसरली होती. अनेकांनी खिडकीतून उड्या मारल्या, तर काही जणांना आपला जीव गमवावा लागला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांचं पथक दाखल झालं आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाची तीन ते चार वाहनं तसेच चार ते पाच रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. साधारणपणे अर्धा तासाहून अधिक काळ पेटलेली बस विझवण्याचा प्रयत्न सुरू होता. बस पेटल्यानंतर ज्या प्रवाशांना बसमधून खाली उतरता आलं त्यांनी उड्या मारल्या. परंतु जे प्रवाशी तर आतमध्ये अडकले होते त्यांचा दुदैवी मृत्यू झाला.

    नाशिक शहरातील औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर ही भीषण घटना घडली आहे. मिरची हॉटेल परिसरात चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतल्याने बसमधील काही क्षणात जळून खाक झाली आहे. आग एवढी भीषण होती की काही वेळात आगीत झालेल्या स्फोटाने परिसरातील नागरिक खडबडून जागे झाले. चिंतामणी ट्रॅव्हलची ही यवतमाळ येथून मुंबईकडे निघालेली बस होती. दरम्यान नाशिकमधून ही बस मुंबईकडे मार्गस्थ झाली असतांना पहाटे साडे चार ते पाच वाजेच्या सुमारास ही घडल्याचे प्रत्यक्ष दर्शनी यांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.