Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ऐन हळदीच्या कार्यक्रमात शनिपेठ पोलिसांची धडक; दोन बालविवाह उधळले
    क्राईम

    ऐन हळदीच्या कार्यक्रमात शनिपेठ पोलिसांची धडक; दोन बालविवाह उधळले

    editor deskBy editor deskJuly 14, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जमूना नगरसह कांचन नगरातील बिंदूबाई हॉल येथे दोन अल्पवयीन मुलींचे लग्न लावून देण्याची तयारी सुरू होती. शनिपेठ पोलिसांनी तात्काळ त्याठिकाणी धाव घेत दोघांचे बालविवाह रोखले आणि वधू-वरांच्या आई-वडिलांना समज दिली. अन्य गावातील दोन अल्पवयीन मुलींचा विवाह शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जमुनानगर व कांचननगरमधील तरुणांशी दोन वेगवेगळ्या दिवशी लावला जात होता.

    याबाबतची माहिती मिळताच शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, उपनिरीक्षक प्रिया दातीर, संतोष खेडकर, पोहेकों विजय खैरे, अजय निकम, अनिल साळुंखे, अमोल वंजारी, पराग दुसाने, नीलेश घुगे, नत्वजीत चौधरी, संभाजी पाटील गणेश ढाकणे यांनी वेळीच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बालविवाह रोखले. लग्नघरी हळद लावण्याची तयारी झाली आणि पोलिस पथक तेथे पोहचले आणि त्यांनी सुरु असलेला बालविवाह रोखला.

    विवाह करण्यासाठी मुलीचे वय १८ तर मुलाचे २१ वर्ष असणे बंधनकारक आहे. तसे नसल्यास वधू-वरांच्या मातापितांवरच नव्हे तर विवाहाला मूक संमती देणाऱ्या नातेवाईक, पुरोहीत, मंडप, डेकोरेटर्ससह बँडवाले आणि फोटो ग्राफर यांना देखील गुन्ह्यात सहआरोपी करुन त्यांचे व्यावसायीक परवाने रद्द केले जाणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कष्टकरी कुटुंबातून मुंबई कोर्टापर्यंत; भगवान नन्नवरे यांची प्रेरणादायी वाटचाल

    August 11, 2026

    शालार्थ घोटाळ्याचा जळगाव कनेक्शन धक्कादायक! ६६ संस्था, ८४९ जण संशयाच्या भोवऱ्यात

    August 11, 2026

    कुंभमेळ्याच्या नावाखाली ४००-५०० कोटींचा गंडा? ‘जामनेर कनेक्शन’चा पर्दाफाश; गिरीश महाजनांकडे तक्रार धडकताच यंत्रणा सतर्क!

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.