Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कार व बसचा भीषण अपघात : 5 भाविक जागीच ठार
    क्राईम

    कार व बसचा भीषण अपघात : 5 भाविक जागीच ठार

    editor deskBy editor deskOctober 5, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लातूर : वृत्तसंस्था

    उदगीर मार्गावरील लोहारा गावाजवळ भीषण अपघात झाला. एसटी बस आणि कारमध्ये भीषण अपघात झालाय. या अपघातात कारमधील 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर बसमधील 10 प्रवासी जखमी झालेत. ठार झालेले हे कारमधील प्रवासी आहेत. एका गंभीर जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

    उदगीर येथून कुटुंब कारने सकाळी निघाले होतं. कारमधून सहा जण तुळजापुरला दर्शनासाठी निघाले होते. लातूर- उदगीर मार्गावर हैबतपुर जवळील पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर कुत्र्यांना वाचवताना चालकाने कार वळवली आणि त्याचवेळी समोरुन येणाऱ्या एसटी बसवर जाऊन जोरदार धडकली. यात कारचा चेंदामेंदा झाला. अपघातग्रस्त बस ही उदगीरहून चाकूरला जात होती. कार आणि एसटीची समोरासमोर झालेली ही धडक एवढी भीषण होती की या बसचे समोरील चाक निखळून बाहेर आले. मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील प्रवासी हे तुळजापूर येथे देवदर्शनाला निघाले होते. त्यावेळी हा भीषण अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.

    उदगीर – नळेगावर रस्त्यावरील हैबतपूर पाटीजवळ हा भीषण अपघात झालाय. कारमधील भाविक तुळजापूरच्या तुळजाभवानीचं दर्शन घेऊन माघारी परतत होते तर बस चाकूर कडे जात होती. अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, जखमींना रुग्णालयात हलवले.
    या अपघातात अलोक तानाजी खेडकर, कोमल व्यंकट कोदरे, अमोल जीवनराव देवकते, यशोमती देशमुख आणि चालक नागेश ज्ञानेश्वर गुंडेकर यांचा मृत्यू झाला. तर प्रियांका गजानन बनसोडे गंभीर जखमी आहे. सर्व मृतदेह उदगीर येथील रुग्णालयात नेण्यात आले आहेत. अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कर्की फाट्यावर अपूर्ण पुलामुळे सर्व्हिस रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य; गणेशमूर्ती नेताना भक्तांना तारेवरची कसरत !

    September 13, 2026

    रिचार्ज अपडेट करताना बँक खात्यावर डल्ला; वृद्धाचे तब्बल १० लाख लंपास

    September 13, 2026

    वरण-बट्टी खराब, तक्रार केली म्हणून मारहाण; जळगावात घडली घटना !

    September 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.