Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तरुणाने केला तरुणीवर गोळीबार…अन घडल ते धक्कादायक
    क्राईम

    तरुणाने केला तरुणीवर गोळीबार…अन घडल ते धक्कादायक

    editor deskBy editor deskSeptember 29, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पालघर : वृत्तसंस्था

    बोईसर टीमा हॉस्पीटलजवळ तरुणाने केलेल्या गोळीबारात तरुणीचा मृत्यू झाला आहे. हत्येनंतर वाहनासमोर उडी मारून तरुणानेही आत्महत्या केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.
    नेहा दिनेश महतो असे मृत तरुणीचे नाव आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपी तरुण कृष्णा यादवने सीआयएसएफच्या वाहनाखाली उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

    बोईसर टीमा हॉस्पीटलजवळ काल दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास कृष्णा यादव (रा. कोलवडे) या माथेफिरू तरुणाने स्नेहा मेहतो (रा. सरावली) या तरुणीची पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडत हत्या केली. यानंतर तिथून पळून जात त्यांने गाडीच्या खाली जात जीव देण्याचा प्रयत्न केला यात त्याला गंभीर दुखापत झाली होती, उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.
    कृष्णा यादव असे आरोपी तरुणाचे नाव असून तो उत्तर प्रदेशचा रहिवासी होता. तर मयत मुलगी बिहारची रहिवासी होती. दोघेही एकमेकांच्या ओळखीचे होते. मात्र कशावरून तरी दोघांमध्ये भांडण झाले, त्यानंतर तरुणाने त्याच्याकडे असलेल्या बंदूकीने तरुणीवर गोळ्या झाडल्या.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.