Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोहाडी फाट्याजवळील हॉटेलमध्ये तरुणास मारहाण
    क्राईम

    मोहाडी फाट्याजवळील हॉटेलमध्ये तरुणास मारहाण

    editor deskBy editor deskSeptember 23, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    मेहरूण व मोहाडी फाट्यावरील हॉटेल नेक्स्टमध्ये तरुणीच्या पार्टीसाठी गुरुवारी रात्री शहरातील दोन महाविद्यालयातील १२ तरुण तरुणी जमले होते. रात्री नऊ वाजता यातील एका तरुणाला बाहेर काढून २० ते २५ जणांच्या घोळक्याने बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत रामानंद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

    शहरातील महाविद्यालयातील पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या मित्र मैत्रिणींचा ग्रुप आहे. यातील एका तरुणीचा गुरुवारी वाढदिवस होता. त्यासाठी हॉटेल गोल्डन नेक्स्ट येथे एक टेबल बुक केला होता. या ठिकाणी मित्र-मैत्रिणी जमले होते. केक कापून झाल्यानंतर मुलं ड्रिंक घेण्यासाठी वरच्या मजल्यावर गेले असता. शोएब हा एकटाच मुलींसोबत बसून होता. या वेळी अचानक २० ते २५ जणांचा घोळका या ठिकाणी आला. त्यांनी शोएबला मारहाण करत रूमच्या व हॉटेलच्या बाहेर रस्त्यावर आणून पुन्हा बेदम मारहाण केली. अचानक होणाऱ्या मारहाणीच्या प्रकाराने रस्त्यावर मोठ्या संख्येने बघ्यांनी गर्दी केली होती. दरम्यान, मारहाणीत शोएब पठाण हा गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला व कानामागे जखमा झाल्या आहेत. त्याला अगोदर गुलाबराव देवकर हॉस्पिटलला येथे नेण्यात आले. त्यानंतर त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर रामानंद व एमआयडीसी पोलिसाच्या व्हॅन घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी जमाव पांगवले. रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.