Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुल चोर करणारे समजून ब्लँकेट विकणाऱ्यांनाच दिला बेदम चोप
    क्राईम

    मुल चोर करणारे समजून ब्लँकेट विकणाऱ्यांनाच दिला बेदम चोप

    editor deskBy editor deskSeptember 14, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : वृत्तसंस्था

    शहरात मुलं पळवणारी टोळी आली म्हणत ब्लँकेट विकणाऱ्यांना दोघांना नागरिकांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. नाशिकच्या टाकळीरोड परिसरात ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेनं परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

    घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी उपनगर पोलीसांना कळवताच पोलीसांचे पथक दाखल झाले होते. पोलीसांनी त्यांची चौकशी करत कागदपत्रे तपासली. मुलं पळवणारी किंवा चोरणारी ही टोळी नसल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी दोघा ब्लँकेट विक्रेत्यांना पोलीस ठाण्यात घेऊन जात गुन्हा दाखल न करता सोडून दिले.

    यापूर्वी देखील अशा गैरसमजूतीतून मारहाणीच्या घटना समोर आल्या आहे. मुलं पळवणारी किंवा चोरणारी टोळी आली म्हणत नागरिक बेदम मारहाण करतात. पालघरमध्येही मागे मुलं पळवणारी टोळी आली म्हणून साधू-महंतांची हत्या झाली होती. त्यावरून राजकीय रान देखील पेटले होते. आताही सांगली येथे मुले चोरणारी टोळी समजून साधूंना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. जत तालुक्यातील लवंगा येथे ही घटना घडली आहे. मुलं चोरी करणारी टोळी म्हणून यापूर्वी धुळे-जळगाव या परिसरात देखील नागरिकांनी मारहाण केल्याच्या घटना समोर आल्या होत्या.नाशिकच्या घटनेत दोघेही ब्लँकेट विक्रेते असल्याचे तपासांती लक्षात आले. परिसरातील नागरिकांनी मारहाण करणाऱ्यांना वेळीच रोखल्याने अनर्थ टळला आहे.टाकळी परिसरात ब्लँकेट विकत असताना परिसरातील कर मोगल साळवे यांचा लहान मुलगा याने ब्लँकेट ओढल्याने ब्लँकेट विकणार्याला त्याचा राग आला होता. त्याने लहान मुलाचा गळा धरला ही बाब परिसरातील नागरिकांनी बघितली अशी माहिती नागरिक सांगताय. त्यांवेळी मुलं पळवणारी टोळी तर नाही म्हणून मारहाणीचा प्रकार समोर आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.