Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बुडालेला तरुण १३ तासांनी सापडला
    क्राईम

    बुडालेला तरुण १३ तासांनी सापडला

    editor deskBy editor deskSeptember 12, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहराजवळ कांताई बंधारा नागाई-जोगाई मंदिर परिसरात शिवाजी नगर परिसरातील मुलांनी रविवारची ट्रीप काढली होती. यावेळी अचानक एका मुलीचा पाय घसरल्यामुळे ती पाण्यात पडली. एकमेकाला वाचविण्याच्या प्रयत्नात चार मुलं पाण्यात वाहून जात होती. त्यातील तिघांना वाचविण्यात यश आले तर एक तरुण बेपत्ता होता. अखेर मागील १३ तासांनंतर त्याचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे.

    शहराजवळ कांताई बंधाऱ्याजवळ दुपारी 2 मुली आणि 2 मूल बुडाले होते. यापैकी 2 तरुणी व 1 तरुणास पाण्यातून बाहेर काढण्यात यशस्वी झाले आहे. मात्र नयन योगेश निंबाळकर (वय १७) हा तरुण सापडला नव्हता. नयनला शोधण्यासाठी महानगरपालिकेचे अग्नीशमन दलाचे पथक, पोलिस प्रशासनासोबत जैन इरिगेशनच्या पथकाने प्रयत्न केले परंतु रात्री 8 वाजेपर्यंत या पथकाला यश आले नव्हते. अखेर आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह सापडला. नयनचा मृतदेह दुपारी जिल्हा रुग्णालयात आणल्यावर डॉ. रेणुका भंगाळे यांनी नयनला मयत घोषित केले. जिल्हा रुग्णालयात यावेळी शिवाजी नगर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

    शहरातील दुध फेडरेशन परिसरातील मिथीला अपार्टमेंटमधील काही तरूण-तरूणी गणेशोत्सव झाल्यानंतर आज सकाळी पिकनिकसाठी आपआपल्या परिवाराची परवानगी घेवून कांताई बंधारा परिसरात जाण्याचे ठरविले होते. कांताई बंधाऱ्याजवळ सकाळी 11 वाजेच्या सुमारास ते पोहचले. काही तरूणी फोटो काढत असतांना एकीचा पाय सटकला ती खाली पडताच तिला वाटविण्यासाठी दोन ते तीन मुलांनी पाण्यात उडी घेतली, यामध्ये काही तरूणांना बाहेर येता आले तर एक तरूणाला बाहेर येता आले नाही. त्यामध्ये पाऊस सुरु असल्याने पाण्याचा प्रवाह वाढत गेल्याने तरूण वाहून गेला. त्यानंतर या घटनेची परिवाराला माहिती मिळताच परिवारातील काही सदस्य घटनास्थळी दाखल होवून स्थानिक गावकऱ्यांच्या तसेच मनपाच्या अग्निशमन विभागाच्या पथक व जैन इरिगेशनच्या टिमच्या माध्यमातून तरूणास नदीत शोधण्याचे कार्य तब्बल 7 तास सुरु होते. परंतु या पथकाला रात्री 8 वाजेपर्यंत यश मिळालेले नव्हते.  मनपाचे शरद सोनवणे, शशि बारी, गिरीश खडके, भुषण पाटील तर जैन इरिगेशनच्या पथकाचे मदत कार्यामध्ये रतिलाल सोनवणे, सागर भोई, प्रवीण वाणी यांनी शोधकार्यात सहभाग घेतला. यावेळी पोलिस निरिक्षक रामकृष्ण कुंभार, पीएसआय नयन पाटील यांच्यासह तालुका पोलिस स्थानकाचे पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026

    गच्चीवर मंडप, तिथेच दहावीची परीक्षा; बीडमधील धक्कादायक नियोजनशून्यता

    February 21, 2026

    धक्कादायक : प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. शेख यांच्या धारदार शस्त्राने हल्ला !

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.