Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » समता नगरातील तरूणाचा कांताई बंधाऱ्यात बुडून मृत्यू
    क्राईम

    समता नगरातील तरूणाचा कांताई बंधाऱ्यात बुडून मृत्यू

    editor deskBy editor deskSeptember 9, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    गणपती विसर्जनासाठी गेलेल्या समता नगरातील तरूणाचा कांताई बंधाऱ्यात बडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार ९ सप्टेंब रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची प्रचंड गर्दी जमली होती. भगवान नामदेव राठोड (वय-१८) रा. समता नगर जळगाव असे मृत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

    नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान राठोड हा आपल्या आई व मोठा भाऊ यांच्यासोबत समता नगरात वास्तव्याला होता. भावासोबत बांधकामाचे स्टाईल बसविण्याचे काम करत होता. शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास समता नगरातील गणेश मंडळाच्या गणपती विसर्जनासाठी मंडळाच्या तरूणांसोबत गिरणा नदिवरील कांताई बंधारा येथे गेला होता. यावेळी तरूणासांबत भगवान देखील पाण्यात उतरला. दरम्यान, त्याला पाण्याचा अंदाज न असल्याने वाहत्या पाण्यात पाय घसरून पडला. यावेळी उपस्थित तरूणांनी आरडा ओरड केली परंतू तोपर्यंत त्याचा बुडून मृत्यू झाला आहे. त्याला पाण्याच्या बाहेर काढून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती. मयताच्या पश्चात आई, मोठा भाऊ विष्णू, दोन विवाहित बहिण असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026

    गच्चीवर मंडप, तिथेच दहावीची परीक्षा; बीडमधील धक्कादायक नियोजनशून्यता

    February 21, 2026

    धक्कादायक : प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. शेख यांच्या धारदार शस्त्राने हल्ला !

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.