Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » हायकोर्टाचा खडसेंना मोठा दिलासा ; दूध संघातील संचालक मंडळ कायम 
    Uncategorized

    हायकोर्टाचा खडसेंना मोठा दिलासा ; दूध संघातील संचालक मंडळ कायम 

    editor deskBy editor deskAugust 30, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    राज्य सरकारच्या प्रशासकाची नेमणूकीच्या विरोधात हायकोर्टात गेलेल्या संचालक मंडळाला मोठा दिलासा मिळाला असून प्रशासक मंडळ बरखास्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

    माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांनी  सांगितले की, हायकोर्टाने प्रशासक मंडळ नियमबाह्य असल्याचे सांगत ते बरखास्त केले आहेत. तसेच कोर्टाचे आदेश मिळाल्याबरोबर संचालक मंडळ आपला पदभार स्वीकारणार आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वी खडसे यांनी पत्रकार परिषद घेत, राजकीय हेतूने आ.गिरीश महाजन, एन.जी.पाटील यांनी दिलेल्या अर्जावर मुख्यमंत्री यांनी समिती नेमली आहे. मी आव्हान देतो, कुणीही यावे आणि दूध संघात पाहणी करावी. सरकारच्या तपासणीत आजवर कोणतेही गंभीर दोष आढळून आले नाही. केवळ राजकीय द्वेषापोटी हे केले जात आहे. संचालक मंडळ बरखास्त करायचे होते, तर त्याची चौकशी होणे, त्यांच्यावर आरोप सिद्ध होणे आवश्यक होते,असेही खडसे म्हणाले. दूध संघाच्या निवडणुका जाहीर झाल्या असून न्यायालयाने दि.३० सप्टेंबरपर्यंत निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे सहकाराच्या एका नियमानुसार निवडणूक होईपर्यंत संचालक मंडळ कार्यरत राहू शकते. दरम्यान खडसे यांच्या दाव्यानुसारच हायकोर्टाने आज प्रशासक मंडळ नियमबाह्य असल्याचे सांगत संचालक मंडळ कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच यांचे पाटील यांची त्रयस्थ अर्जदार म्हणूनची याचिका फेटाळली आहे. तर सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी मागितलेली चार आठवड्यांची मुदत देखील कोर्टाने अमान्य केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पाळधीत मोठी दुर्घटना! स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी, २ गंभीर

    March 16, 2026

    बचत खात्यात शिल्लक कमी? दंडाबाबत मोठी माहिती समोर

    March 11, 2026

    प्रशासकीय राजवटीतील निर्णयांवर श्वेतपत्रिका जाहीर करा नगरसेविका वैशाली अमित पाटील

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.