Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ‘आम्ही गद्दार नाही, आम्ही खुद्दारच’
    जळगाव

    ‘आम्ही गद्दार नाही, आम्ही खुद्दारच’

    editor deskBy editor deskAugust 21, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    आम्ही शिवसेना वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केलेत मात्र शिवसेना वाचवण्यासाठी केलेला हा प्रयत्न आदित्य ठाकरे यांना आवडलेला नाही. त्यामुळेच ते आमच्यावर टीका करत आहेत. मात्र आम्ही गद्दर नाही तर आम्ही खुद्दार आहोत, असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी गद्दार म्हणणाऱ्या आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.

    हे सरकार कोसळणारच असेही आदित्य ठाकरे म्हणाले होते. त्यावरही मंत्री गुलाबराव पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. हे सरकार शिवसेना व भाजप युतीचं सरकार आहे. याकडे त्यांनी त्याच दृष्टीने बघावं, असंही मंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.
    शिंदे गटात जाण्यापूर्वी मी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र त्यावेळी त्यांनी त्याची दखल घेतली असती तर आज वेळ ही आली नसती. सर्वात आधी मी गेलो नाही. ३२ आमदार गेल्यानंतर मी शिंदे गटात सहभागी झालो. मी एकटा नाही तर मी २० आमदार घेऊन उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो होतो. मात्र त्यावेळी त्यांनी ज्याप्रमाणे शिवाजी महाराज तह करायचे तसा तह केला असता, तर ही वेळ आली नसती. आदित्य ठाकरे हे तरुण आहेत. त्यावेळी त्यांनी अशाच पद्धतीने राज्यभर दौरे करायला हवे होते, अशी आमची अपेक्षा होती. मात्र त्यांनी तसं केलं नाही, असंही गुलाबराव पाटील म्हणाले. मात्र आमची त्यावेळची इच्छा अपेक्षा आदित्य ठाकरे आता पूर्ण करत आहेत. त्यामुळे देव त्यांचं भलं करो, असा गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.

    जे शिवसेना संपवायला निघाले आहेत त्यांच्यासोबतच शिंदे गटाने युती केली, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती. यावरही मंत्री गुलाबराव पाटील यांनी मत व्यक्त केलं. एकनाथ खडसेंनी भाजप आणि शिवसेनेची युती तोडली होती. त्या एकनाथ खडसेंसोबत तुम्ही बसले. आणि आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी भाजपसोबत युती केली तर आम्ही गद्दार काय. नाही आम्ही खुद्दारच आहोत असं उत्तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी गद्दार म्हणणाऱ्या आदित्य ठाकरे यांना दिलं.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ? : पडळकरांचा खळबळजनक आरोप !

    March 25, 2026

    भोंदू खरात प्रकरण पेटले; “मोठ्या लोकांचा हात” : दमानिया यांचा गंभीर आरोप

    March 25, 2026

    मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर तरुणाचा मृत्यू; हलगर्जीपणाचा आरोप, जळगावात खळबळ

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.