Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरलाय का? भर बाजारात असोसिएशन पदाधिकाऱ्यांवर पिस्तुल रोखले
    क्राईम

    जळगावात गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरलाय का? भर बाजारात असोसिएशन पदाधिकाऱ्यांवर पिस्तुल रोखले

    editor deskBy editor deskNovember 29, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील दाणा बाजारात वाहन लावण्यावरुन शुकवारी वाहन चालकांमध्ये वाद झाले होते. शनिवारी या वाहनचालकांच्या असोसिएशनची बैठक सुरु असतांना यात एका जणाने असोसिएशनच्या अध्यक्षांवर गावठी पिस्तुल रोखल्याची घटना दुपारी एक वाजेच्या सुमारास दाणा बाजार परिसरात घडली. दरम्यान बैठकीत उपस्थित असलेल्यांनी संशयिताजवळील गावठी पिस्तुल हिसकावल्यानंतर संशयित तेथून पसार झाला. पोलिसांनी ते पिस्तुल हस्तगत केले असून संशयिताचा शोध सुरु आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झालेला नव्हता.

    मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील दाणाबाजारात जिल्हाभरातून वाहन चालक व्यापाऱ्यांचा मालाची वाहतुक करण्यासाठी येत असतात. याठिकाणी ट्रान्सपोर्ट चालकांचे देखील वाहने लावलेली असतात. शुक्रवारी वाहने लावण्याच्या कारणावरुन वाहन चालकांमध्ये वाद झाले. दरम्यान, शनिवारी या वाहनचालकांच्या असोसिएशनमधील पदाधिकाऱ्यांसह वाहन चालकांची बैठक सुरु होती. या बैठकीत आलेल्या एकाने पदाधिकाऱ्यांसोबत वाद घालीत त्याजवळ असलेला गावठी पिस्तूल रोखून धरला. अचानक झालेल्या या घटनेमुळे बैठकीत एकच खळबळ माजून गेली. दरम्यान, बैठकीत उपस्थितांनी गावठी पिस्तूल रोखणाऱ्याच्या हातातून पिस्तूिल हिसकावल्यानंतर संशयित तेथून पसार झाला.

    पर्दाधिकाऱ्यांवर गावठी पिस्तुल रोखल्याची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ते गावठी पिस्तुल ताब्यात घेतले असून संशयिताचा कसून शोध घेत आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता गेल्या काही दिवसांपुर्वीच शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवीगाळ केल्याच्या वादातून एकमेकांच्या घरासमोर गोळीबार केल्याच्या घटना घडल्या. या घटनांमधील संशयित अद्याप फरार असतांना आणि या घटनांची धग कमी होत नाही. तोच पुन्हा भर बाजारपेठत असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांवर गावठी पिस्तूल रोखल्यामुळे गुन्हेगारांना कायदा धाक आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पाचोऱ्यावर शोककळा : शिवसेनेचे कार्यकर्ते राजेश काळे यांचे भीषण अपघातात निधन !

    November 29, 2026

    मोबाईल चोरी अन् जबरी लुटीचे गंभीर गुन्हे; यावलच्या दोन गुन्हेगारांची जिल्ह्यातून हकालपट्टी!

    November 29, 2026

    सुप्रिम कॉलनीतील टेकडीवर मारहाणीचा थरार : तिघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा

    November 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.