Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोबाईल चोरी अन् जबरी लुटीचे गंभीर गुन्हे; यावलच्या दोन गुन्हेगारांची जिल्ह्यातून हकालपट्टी!
    क्राईम

    मोबाईल चोरी अन् जबरी लुटीचे गंभीर गुन्हे; यावलच्या दोन गुन्हेगारांची जिल्ह्यातून हकालपट्टी!

    editor deskBy editor deskNovember 29, 2026Updated:November 29, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवशांजवळील मोबाईलसह रोकड हिसकावण्यासह जबरी चोरीचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या टोळीतील समशेर शहा सलीम शहा (वय २८, बाहेरपुरा यावल) व समीर उर्फ भांजा रहेमान तडवी (वय २३, रा. तडवी कॉलनी यावल) या दोघांना जिल्ह्यातून सहा महिन्यांकरीता हद्दपार करण्यात आले. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी काढलेत.

    जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांवर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिले होते. त्यानुसार यावल येथील समशेर शहा व समीर उर्फ भांजा तडवी हे दोघ टोळी तयार करुन भुसावळ व यावल शहरात रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल व पैसे चोरणे, नागरिकांना अडवून त्यांच्याकडे मौल्यवान वस्तू जबरीने चोरणे, महिलांचा विनयभंग, मारहाण करुन दहशत निर्माण करीत असल्याने तयांच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहे. वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावाची चौकशीनंतर पोलीस अधीक्षकांनी सहा महिन्यांकरीता दोघांना जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पाचोऱ्यावर शोककळा : शिवसेनेचे कार्यकर्ते राजेश काळे यांचे भीषण अपघातात निधन !

    November 29, 2026

    सुप्रिम कॉलनीतील टेकडीवर मारहाणीचा थरार : तिघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा

    November 29, 2026

    नशिराबादमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत : पाच वर्षांच्या चिमुरडीवर हल्ला; हाताला १३ टाके!

    November 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.