Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शरद पवार भाजपच्या डावात अडकणार नाहीत : हर्षवर्धन सपकाळ
    जळगाव

    शरद पवार भाजपच्या डावात अडकणार नाहीत : हर्षवर्धन सपकाळ

    editor deskBy editor deskNovember 28, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    परिसीमन विधेयकावरून सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. शरद पवार यांचा संपूर्ण प्रवास शिव-शाहू-फुले-आंबेडकर आणि संविधानवादी विचारांचा राहिला असून, ते भारतीय जनता पक्षाच्या डावात अडकणार नाहीत व या विधेयकाच्या विरोधातच मतदान करतील, असा विश्वास सपकाळ यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकारणातील पैशाचा वापर आणि संविधानातील लोकशाही मूल्यांवरही भाष्य केले.

    हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, शिव-शाहू-फुले-आंबेडकर आणि संविधानवादी विचारांचा संपूर्ण प्रवास शरद पवार यांचा राहिला आहे. ते भाजपच्या कुटील डावामध्ये अडकणार नाहीत, हे त्यांच्याबद्दलचे आमचे आकलन आहे आणि त्यांचे व्यक्तिमत्त्वही तसेच आहे. त्यामुळे ते निश्चितपणे या विधेयकाला पाठिंबा देणार नाहीत आणि विधेयकाच्या विरोधात मतदान करतील, अशी आम्हाला पूर्ण खात्री व आशा आहे.”

    सध्याच्या राजकीय परिस्थितीवर टीका करताना सपकाळ म्हणाले, आज नाण्याची दुसरी बाजू म्हणजे केवळ ‘पैसा, पैसा आणि पैसा’ अशी झाली आहे. हा पैसा भ्रष्टाचारातून आणि देश विकून मिळवला जात आहे, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. सत्ता पैशासाठी आणि पैसा वारेमाप कमावण्यासाठी व पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी वापरायचा, हे गणित आज देशात दृढ झाले आहे. याचा सर्वांनी निषेध केला पाहिजे.”

    भारतीय संविधानाने निर्माण केलेल्या लोकप्रतिनिधित्व व्यवस्थेवर बोलताना ते म्हणाले की, “आपण या व्यवस्थेकडे केवळ साक्षीभावाने नव्हे, तर कर्तव्यभावनेने पाहिले पाहिजे. पूर्ण देशाची किंवा राज्याची ग्रामसभा होऊ शकत नाही, त्यामुळे ‘टू द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल’ या सूत्रानुसार कारभार चालवायचा आहे. आपण समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची भूमिका स्वीकारली असून, ‘वन मॅन, वन व्होट, वन व्हॅल्यू’ हा आपल्या निवडणुकीचा ढाचा आहे.” या ढाच्यानुसार भाषा, धर्म, भूगोल, लिंग, प्रांत आणि जातीवाद बाजूला ठेवून सर्वांना सर्वसमावेशक प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे आणि आपण सर्वांनी भारतीय म्हणून राहावे, हे लोकशाहीने सुनिश्चित केले असल्याचे त्यांनी नमूद केले.

    राष्ट्र उभारणीतील योगदानाचा उल्लेख करताना सपकाळ यांनी पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचा दाखला दिला. ते म्हणाले, “महात्मा गांधींनी सांगितले होते की, या देशाचा मालक कोण? तर मंत्री, आमदार, खासदार, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान हे या देशाचे मालक नाहीत, तर या देशाचा सर्वसामान्य माणूस हाच खरा मालक असला पाहिजे. हीच भूमिका आपल्या स्वातंत्र्यसंग्रामाने स्वीकारली असून, हे संविधान आपण स्वतःप्रती समर्पित केले आहे.” याच संवैधानिक तत्त्वांच्या आधारे डिलिमिटेशनच्या मुद्द्याकडे पाहिले पाहिजे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    नशिराबादमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत : पाच वर्षांच्या चिमुरडीवर हल्ला; हाताला १३ टाके!

    November 28, 2026

    धरणगावात डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव; पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात नगरसेवक आक्रमक!

    November 28, 2026

    शेळगाव बॅरेजच्या नदीपात्रात तरुणाचा टोकाचा निर्णय ; दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर मृतदेह आढळला!

    November 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.