Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शेळगाव बॅरेजच्या नदीपात्रात तरुणाचा टोकाचा निर्णय ; दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर मृतदेह आढळला!
    क्राईम

    शेळगाव बॅरेजच्या नदीपात्रात तरुणाचा टोकाचा निर्णय ; दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर मृतदेह आढळला!

    editor deskBy editor deskNovember 28, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी 

    शेळगाव बॅरेज परिसरातील नदीपात्रात उडी घेऊन ४५ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. राजू शहाजी नेरकर (वय ४५, मूळ रा. जिल्हा भंडारा, सध्या रा. जळगाव एमआयडीसी) असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते एका नामांकित कृषी कंपनीत मार्केटिंग मॅनेजर म्हणून कार्यरत होते.

    मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी राजू नेरकर यांनी शेळगाव बॅरेज पुलावरून नातेवाईकांशी मोबाईलद्वारे संपर्क साधल्यानंतर नदीपात्रात उडी घेतल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळाली. घटनेची माहिती समजल्यानंतर नातेवाईकांच्या विनंतीवरून जिल्हा प्रशासनाच्या वतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. दोन दिवसांच्या शोधकार्यानंतर आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला.

    दरम्यान, भुसावळ नगरपरिषद अग्निशमन दलाला दुपारी २ वाजता घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर शोध व बचाव कार्यासाठी पथकाने घटनास्थळी धाव घेतली. नगरपरिषद प्रशासनाचे जिल्हा सहआयुक्त तथा मुख्याधिकारी जनार्दन पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख नरवीरसिंग रावल आणि यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

    या शोधमोहिमेत भुसावळ अग्निशमन दलाचे कर्मचारी गजेंद्र जावळे, हितेश रायपुरकर, गौरव सपकाळे, गजू सावकारे, समाधान पाटील, यावल पोलीस स्टेशनचे उमेश महाजन व त्यांचे सहकारी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी सहभाग घेत सहकार्य केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    परीक्षा देऊन घरी येताना तरुणाचा दुर्देवी अपघातात मृत्यू !

    November 28, 2026

    घरकामासाठी आलेल्या व्यक्तीनेकडून घरफोडी : एमआयडीसी पोलिसांची कामगिरी !

    November 28, 2026

    चोपडा तालुक्यातील भीषण अपघातात महिलेचा मृत्यू, सहा गंभीर !

    November 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.