Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चोपडा तालुक्यातील भीषण अपघातात महिलेचा मृत्यू, सहा गंभीर !
    क्राईम

    चोपडा तालुक्यातील भीषण अपघातात महिलेचा मृत्यू, सहा गंभीर !

    editor deskBy editor deskNovember 28, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    चोपडा तालुक्यातील अडावद येथून नातेवाइकांच्या मुलाच्या लग्नाचा बस्ता घेण्यासाठी जळगावकडे निघालेल्या रायसिंगे कुटुंबाच्या कारला भीषण अपघात झाला. अडावद रोडवरील चेरी फॅक्टरी परिसरात कारचे पुढील टायर अचानक फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कार रस्त्यावर पलटी झाली. या दुर्घटनेत बवनबाई भगवान रायसिंगे (वय ६५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अन्य सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, रायसिंगे कुटुंबीय लग्नाचा बस्ता खरेदी करण्यासाठी सकाळी कारने जळगावच्या दिशेने रवाना झाले होते. प्रवासादरम्यान चेरी फॅक्टरी परिसरात कारचे पुढील टायर अचानक फुटले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून कार रस्त्यावर उलटली. या अपघातात कारमधील प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या. या दुर्घटनेत बवनबाई भगवान रायसिंगे यांचा मृत्यू झाला. तर कैलास शिवा रायसिंगे, पुंडलिक शिवा रायसिंगे, दिनेश पुंडलिक रायसिंगे, रेखा पुंडलिक रायसिंगे यांच्यासह अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लग्नाच्या आनंदासाठी घराबाहेर पडलेल्या कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळल्याने अडावद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या अपघाताची संबंधित पोलीस ठाण्यात अद्याप नोंद झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शेळगाव बॅरेजच्या नदीपात्रात तरुणाचा टोकाचा निर्णय ; दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर मृतदेह आढळला!

    November 28, 2026

    परीक्षा देऊन घरी येताना तरुणाचा दुर्देवी अपघातात मृत्यू !

    November 28, 2026

    घरकामासाठी आलेल्या व्यक्तीनेकडून घरफोडी : एमआयडीसी पोलिसांची कामगिरी !

    November 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.