Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कजगावमध्ये गुन्हेगारांचे धाडस वाढले? तरुणावर गोळी झाडली; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!
    क्राईम

    कजगावमध्ये गुन्हेगारांचे धाडस वाढले? तरुणावर गोळी झाडली; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

    editor deskBy editor deskNovember 26, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव  : प्रतिनिधी 

    तालुक्यातील कजगाव येथे गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गोडगाव ते कजगाव रोडवरील सोलर प्लान्टजवळ एका तरुणावर गोळीबार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  कजगाव येथील रहिवासी जयेश नाना धोबी (पवार) हा तरुण पारोळा रस्त्यावरील सोलर कंपनीत कामासाठी जात असताना २४ रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास गोडगाव ते कजगाव रोडवरील सोलर प्लान्टजवळ त्याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. दरम्यान, दोन ते तीन दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ वादातून मुन्ना उर्फ गिरीष मुक्तारसिंग राजपूत व अन्य दोघांनी हा हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या गोळीबारात जयेश पवार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे कजगावसह परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जखमी जयेश पवार यांच्या पत्नी दिव्या जयेश पवार (रा. कजगाव) यांच्या फिर्यादीवरून संशयित मुन्ना उर्फ गिरीष मुक्तारसिंग राजपूत व अन्य दोघा व्यक्तींविरोधात भडगाव पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, भडगावचे पो.नि. महेश टाक, पो.उ.नि. सुशील सोनवणे व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेचा तपास पो.उ.नि. सुशील सोनवणे करत आहेत. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाल्याने त्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. कजगावमध्ये गोळीबाराच्या घटनेने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शेतशिवारात काळाचा घाला : नातीसमोर आजोबांचा दुर्दैवी अंत; अपघातानंतर ग्रामस्थांनी डंपर पेटवला!

    November 26, 2026

    जामनेर रोडवर मृत्यूचा थरार : पादचाऱ्याला चिरडून अज्ञात वाहनचालक फरार!

    November 26, 2026

    दुःखाच्या प्रसंगात चोरट्यांची संधीसाधू चोरी : ५ तोळे सोन्याचे दागिने लंपास!

    November 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.