Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रेमीयुगुलावर अल्पवयीन टोळक्याचा अमानुष हल्ला; व्हिडिओ व्हायरल, ८ जण ताब्यात!
    क्राईम

    प्रेमीयुगुलावर अल्पवयीन टोळक्याचा अमानुष हल्ला; व्हिडिओ व्हायरल, ८ जण ताब्यात!

    editor deskBy editor deskNovember 22, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    कुर्ला पश्चिम भागातील फीनिक्स मार्केटसिटी मॉलमागील प्रमोद महाजन उद्यानात दिवसाढवळ्या ८ ते १० अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने एका तरुण-तरुणीवर अमानुष हल्ला चढवला. शेजारील इमारतीतील रहिवाशाने या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल केल्यानंतर संपूर्ण मुंबईत संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी तातडीने पावले उचलत ८ विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे.

    शुक्रवारी (२० नोव्हेंबर) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास २२ वर्षीय तरुण आणि त्याची २१ वर्षीय मैत्रीण प्रमोद महाजन उद्यानात फिरायला गेले होते. दोघेही मोबाइलवर फोटो काढत असताना तिथे आलेल्या अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने तरुणीवर अश्लील शेरेबाजी सुरू केली. तरुणाने या प्रकाराला विरोध करताच टोळक्याने संतापून त्याच्यावर हॉकी स्टिक, लाकडी दांडके आणि बेल्टने बेदम मारहाण सुरू केली.

    तरुणाला वाचवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या तरुणीच्या डोक्यावर लाकडी काठीने वार करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जीव वाचवण्यासाठी दोघांनीही उद्यानाबाहेर पळ काढला, या हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांवर राजावाडी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. भाजपचे मुंबई अध्यक्ष तथा आमदार अमित साटम आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सीसीटीव्ही तपासावे, महापालिका-पोलिसांना शहरातील सर्व उद्यानांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे आवाहन केले.

    घटनेचा थरारक व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचताच घाटकोपर पोलिसांनी पीडित तरुण-तरुणीचा शोध घेऊन त्यांची तक्रार नोंदवली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९(२), १८९(४), ११८(१), ३५२ आणि ३५१(२) अंतर्गत ८ विधिसंघर्षित बालकांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. यापैकी ५ मुलांच्या पालकांना पोलिसांनी कायदेशीर नोटिसा बजावल्या आहेत. सर्व आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात आली असून त्यांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    तीर्थयात्रेवर गेलेल्या धुळ्यातील कुटुंबावर काळाचा घाला; ९ जणांचा मृत्यू!

    November 22, 2026

    रामानंद नगर पोलीस ठाण्यापासून ५०० मीटरवर घरफोडी; १.५५ लाख लंपास!

    November 22, 2026

    फेसबुक मैत्रीचे प्रेमात रूपांतर; लग्नाचे आश्वासन देत अत्याचार, अखेर गुन्हा दाखल!

    November 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.