Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » फेसबुक मैत्रीचे प्रेमात रूपांतर; लग्नाचे आश्वासन देत अत्याचार, अखेर गुन्हा दाखल!
    क्राईम

    फेसबुक मैत्रीचे प्रेमात रूपांतर; लग्नाचे आश्वासन देत अत्याचार, अखेर गुन्हा दाखल!

    editor deskBy editor deskNovember 22, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर लग्नाचे अमिष दाखवत जळगावातील ३० वर्षीय महिलेवर कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणाने अत्याचार केला. सन २०२० ते २०२५ या दरम्यान तो जळगावात महिलेसोबत राहत असतांना घडला. अत्याचारातून तीन वर्षांपुवी मुलगी झाली आहे. तरुण गावी निघून जात असल्यामुळे त्याने लग्नास नकार दिला. त्यावरून रोहन सुनील गारुंगे (रा. इचलकरंजीत, जि. कोल्हापूर) याच्याविरुद्ध दि. २० नोव्हेंबर रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि,  शहरातील रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरातील ३० वर्षीय महिलेची रोहन गारुंगे याच्याशी सन २०२० मध्ये फेसबुकद्वारे ओळख झाली. त्यानंतर मैत्री होऊन त्याचे रुपांतर प्रेमात झाले. संशयित रोहन गारुंगे हा तरुण महिलेला भेटण्यासाठी जळगावात आला आणि त्याने आपण अविवाहित असल्याचे त्याने सांगत लग्नाचे अमिष दाखविले. तेव्हापासून म्हणजेच सन २०२० पासून ते २०२५ पर्यंत तो महिलेच्या घरी तिच्यासोबत राहिला. त्यादरम्यान त्याने महिलेवर पाच वर्ष अत्याचार केला. त्यातून महिला गर्भवती होवून तीने सन २०२३ मध्ये मुलीला जन्म दिला असून ती सद्या तीन वर्षांची आहे.

    मुलगी तीन वर्षाची झालेली असतांना महिलेने गारुंगे याला लग्नाविषयी विचारणा केली, मात्र तो नेहमी वेगवेगळे कारणे देत गावी निघून गेला होता. महिलेने अधिक चौकशी केली असता सदर तरुणाचे लग्न झाल्याचे व त्याला मुले असल्याचे समजले. महिलेने लग्नासाठी तरुणाशी वारंवार संपर्क साधून विचारणा केली. त्यानंतर त्याने महिलेचा मोबाइल क्रमांक ब्लॅकलिस्टमध्ये टाकला. या प्रकरणी महिलेने दि. २० नोव्हेंबर रोजी रामांनद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून रोहन गारुंगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक संजय तडवी करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    प्रेमीयुगुलावर अल्पवयीन टोळक्याचा अमानुष हल्ला; व्हिडिओ व्हायरल, ८ जण ताब्यात!

    November 22, 2026

    तीर्थयात्रेवर गेलेल्या धुळ्यातील कुटुंबावर काळाचा घाला; ९ जणांचा मृत्यू!

    November 22, 2026

    रामानंद नगर पोलीस ठाण्यापासून ५०० मीटरवर घरफोडी; १.५५ लाख लंपास!

    November 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.