Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तीर्थयात्रेवर गेलेल्या धुळ्यातील कुटुंबावर काळाचा घाला; ९ जणांचा मृत्यू!
    क्राईम

    तीर्थयात्रेवर गेलेल्या धुळ्यातील कुटुंबावर काळाचा घाला; ९ जणांचा मृत्यू!

    editor deskBy editor deskNovember 22, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राजस्थानमध्ये तीर्थयात्रेवर गेलेल्या धुळ्यातील एका कुटुंबावर परतीच्या प्रवासात काळाने घाला घातला. कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर भरधाव क्रूझर वाहन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकले. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाला असून, लहान मुलांसह अनेक जण जखमी झाले आहेत. शनिवारी मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास नाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंभूपुरा गावाजवळ ही हृदयद्रावक घटना घडली. अपघातात क्रूझर वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला.

    तीर्थयात्रेवरून परतताना अपघात

    धुळे येथील ३६ नातेवाईकांचा समूह मंगळवारी धार्मिक तीर्थयात्रेसाठी तीन वेगवेगळ्या वाहनांतून रवाना झाला होता. या यात्रेत मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर आणि उज्जैन, राजस्थानमधील सांवरिया सेठ, अजमेर, पुष्कर तसेच खाटू श्यामजी या धार्मिक स्थळांना भेट देण्यात आली. शनिवारी खाटू श्यामजीचे दर्शन घेतल्यानंतर समूह परतीच्या प्रवासाला निघाला होता.

    रात्री साडेदहाच्या सुमारास जयपूर येथे समूहातील सदस्यांनी जेवणासाठी थांबा घेतला. त्यानंतर पहिली गाडी सुमारे अर्धा तास आधी पुढे रवाना झाली. दुसऱ्या वाहनातील कुटुंबीय कोटाच्या दिशेने जात असताना शंभूपुरा परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला त्यांची क्रूझर जोरदार धडकली.

    एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू

    या अपघातात सज्जन (६२), त्यांची पत्नी उषाबाई (६०), बाबूलाल (७५), त्यांची पत्नी सुशीला (६२), मुलगा कैलास (३५), कैलासची पत्नी अनिता (३४), जान्हवी (७), माधवी (३२) आणि सान्वी (३) यांचा मृत्यू झाला. सज्जन आणि बाबूलाल हे सख्खे भाऊ होते. सान्वी ही सज्जन यांची नात, तर माधवी त्यांची सून होती. कैलास सलून व्यवसायात कार्यरत होता.

    क्रूझरमधील प्रवासी एकाच कुटुंबातील नातेवाईक होते. या दुर्घटनेमुळे धुळे येथील त्यांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    वाहनाचा चक्काचूर; बचावकार्य युद्धपातळीवर

    अपघातानंतर क्रूझर वाहन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. अनेक प्रवासी वाहनाच्या आत अडकले होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अत्यंत प्रयत्नांनंतर अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आणि जखमींना रुग्णवाहिकेद्वारे न्यू मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

    पोलिस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्याची पाहणी केली. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. आशुतोष शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर माधवी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यापैकी मनीषा यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

    चालकाला डुलकी लागल्याचा प्राथमिक अंदाज

    प्राथमिक तपासात वाहन चालकाला डुलकी लागल्यामुळे क्रूझरवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

    तीर्थयात्रेचा आनंद घेत एकत्र प्रवास करणाऱ्या कुटुंबातील सदस्यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने धुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. यात्रेतील आनंदाचे क्षण काही तासांतच शोकांतिकेत बदलले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    प्रेमीयुगुलावर अल्पवयीन टोळक्याचा अमानुष हल्ला; व्हिडिओ व्हायरल, ८ जण ताब्यात!

    November 22, 2026

    रामानंद नगर पोलीस ठाण्यापासून ५०० मीटरवर घरफोडी; १.५५ लाख लंपास!

    November 22, 2026

    फेसबुक मैत्रीचे प्रेमात रूपांतर; लग्नाचे आश्वासन देत अत्याचार, अखेर गुन्हा दाखल!

    November 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.