Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रामानंद नगर पोलीस ठाण्यापासून ५०० मीटरवर घरफोडी; १.५५ लाख लंपास!
    क्राईम

    रामानंद नगर पोलीस ठाण्यापासून ५०० मीटरवर घरफोडी; १.५५ लाख लंपास!

    editor deskBy editor deskNovember 22, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    घर घेण्यासाठी पगारातून दर महिन्याला बचत करुन जमाविलेल्या पैशांवर चोरट्यांनी डल्ला मारला. चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली दीड लाखांची रोकड लंपास केली. ही घटना शुक्रवारी दुपारी १ ते ४ वाजे दरम्यान, रामानंद नगर पोलीस ठाण्यापासून ५०० मिटर अंतरावरील पाटबंधारे विभागाच्या शासकीय निवासस्थानात घडली. दोन चोरटे तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवरुन याठिकाणी येतांनाचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

    शहरातील पाटबंधारे विभागात शिपाई म्हणून नोकरीस असलेले मयूर गणेश लोहरे यांचे कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या शासकीय निवासस्थान मिळाले आहे. याठिकाणी ते आई, पत्नीसह वास्तव्यास आहे. त्यांच्या नातेवाईकांचे निधन झाल्यामुळे मयूर लोहरे हे आईसह शिरपूर येथे अंत्यविधीसाठी गेले होते. तर त्यांची पत्नी या कामानिमित्त दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास गावात गेलेल्या होत्या. दरम्यान, काम आटोपल्यानंतर दुपारी चार वाजता त्या घरी परतल्यानंतर त्यांना घराच्या दरवाजे कुलूप लुटलेले दिसून आले. त्यामुळे त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी घटनेची माहिती तात्काळ अंत्यविधीसाठी गेलेल्या पतीला दिली.

    मयूर लोहरे यांनी घटनेची माहिती तात्काळ रामानंद नगर पोलिसांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर फॉरेन्सिक पथकाला देखील पाचारण केले. पोलीस ठाण्यापासून अवघ्या ५०० मिटर अंतरावर भरदिवसा घरफोडीची घटना होत असल्याने चोरट्यांना आता पोलिसांचा धाक नसल्याचे यातून दिसून येत आहे. फॉरेन्सीकच्या पथकासह घटनास्थळहून ठसे तज्ज्ञांनी कपाटा ठेवलेली रोकड चोरतांना त्यांचे हाताचे ठसे मिळून आले. दरवाजाचे कुलूप तोडल्यानंतर चोरटे कुलूप देखील घेवून गेल्याचे लोहरे यांनी सांगितले. चोरट्यांनी लोहरे यांच्या घरातून त्यांनी घर घेण्याकरीता पगारातून बचत केलेली १ लाख ५५ हजार रुपयांची रोकड लांबवून नेले. चोरट्यांनी याच कपाटातील दुसऱ्या बाजूचे कुलूपबंद लॉकर तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते उघडता न आल्यामुळे लोहरे यांचे सोन्याचे दागिने सुखरूप राहिले. पाटबंधारे विभागाचे कार्यालय असलेलय मागील बाजूस समाज कल्याण विभाचे देखील कार्यालय आहे. तसेच त्याच परिसरात हतनूर आणि पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांसाठी शासकीय निवासस्थान देखील आहे. परंतू या ठिकाणी केवळ दोनच कुटुंब राहतात. या कार्यालयाच्या प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. पोलिसांनी १ ते ४ वाजेच्या दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यांना फुटेजमध्ये एका दुचाकीवर दोन इसम तोंडाला रुमा बांधून येतांना आणि जातांना दिसून येत आहे. हे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यानुसार चोरट्यांचा कसून शोध घेतला जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    प्रेमीयुगुलावर अल्पवयीन टोळक्याचा अमानुष हल्ला; व्हिडिओ व्हायरल, ८ जण ताब्यात!

    November 22, 2026

    तीर्थयात्रेवर गेलेल्या धुळ्यातील कुटुंबावर काळाचा घाला; ९ जणांचा मृत्यू!

    November 22, 2026

    फेसबुक मैत्रीचे प्रेमात रूपांतर; लग्नाचे आश्वासन देत अत्याचार, अखेर गुन्हा दाखल!

    November 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.