Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नागरी सेवांचा खोळंबा नको : बंद व नादुरुस्त वाहनांबाबत उपमहापौरांचा अधिकाऱ्यांना अल्टिमेटम!
    जळगाव

    नागरी सेवांचा खोळंबा नको : बंद व नादुरुस्त वाहनांबाबत उपमहापौरांचा अधिकाऱ्यांना अल्टिमेटम!

    editor deskBy editor deskNovember 18, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव शहर महानगरपालिकेच्या वाहन विभागाचा आज दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी मा. उपमहापौर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. या बैठकीस संदीप मोरे (वाहन विभाग प्रमुख), निर्मला गायकवाळ (उपायुक्त,वाहन विभाग), अश्वजित घरडे (अग्निशमन विभाग प्रमुख) व भरत बारी(अग्निशमन विभाग), पंकज गोसावी (उपायुक्त ,अग्निशमन विभाग) व संजय राऊत (सहाय्यक आयुक्त) यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

    बैठकीदरम्यान महानगरपालिकेच्या एकूण वाहनांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला असता, अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण वाहनांपैकी ४ वाहने (जे.सी.बी, रुग्न वाहीका, पोकलेन इ.) बंद अवस्थेत असून, काही वाहनांना किरकोळ व मोठ्या स्वरूपाच्या दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले.

    यावेळी मा. उपमहापौर यांनी बंद पडलेली वाहने तसेच अग्निशमन विभागासह अत्यावश्यक सेवांमध्ये वापरली जाणारी वाहने प्राधान्याने व तातडीने दुरुस्त करून कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या. तसेच वाहनांच्या देखभाल व दुरुस्ती प्रक्रियेत काही त्रुटी किंवा अडचणी असल्यास त्यांची त्वरित दखल घेऊन सुधारणा करावी, वाहनांची नियमित तपासणी व देखभाल करावी, असे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

    महानगरपालिकेची वाहने ही शहरातील दैनंदिन नागरी सेवा, स्वच्छता, आरोग्य व आपत्कालीन सेवांसाठी अत्यंत महत्त्वाची असून, कोणतेही वाहन केवळ दुरुस्तीअभावी बंद राहणार नाही, याची दक्षता संबंधित विभागाने घ्यावी. नागरिकांना मिळणाऱ्या अत्यावश्यक सेवांमध्ये वाहनांच्या अभावामुळे कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी वाहन विभागाने कार्यक्षमतेने काम करावे, असे निर्देश मा. उपमहापौर यांनी यावेळी दिले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावात संतापजनक घटना : चुलत मामाचे बालिकेवर अत्याचार; आरोपीला अटक !

    November 18, 2026

    गोलाणी मार्केट हादरले : चौथ्या मजल्यावरून तरुणाची उडी; मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात !

    November 18, 2026

    विजेच्या खांबावर चढणे ठरले जीवघेणे : तरुण ४० टक्के भाजला

    November 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.