

जळगाव : प्रतिनिधी
उपचारासंदर्भात चर्चा करीत असतांना बोलचाल होवून वाद झाला. या वादात निनाद शाह याच्यावर धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. ३० ऑक्टोंबर रोजी रात्री ८ वाजता जोशीपेठेतील शनिपेठ पोलीस चौकीजवळ घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मेहरुण परिसरातील रजा कॉलनीत राहणाऱ्या बिबी जावेश शाह हे दि. ३० ऑक्टोंबर रोजी जोशी पेठेत त्यांचा नातू उमर शाह याच्या आजाराबाबत चर्चा करण्याठी आले होते. त्यांचा मोठा मुलगा सिनान शाह हे चर्चा करीत असतांना समोरील व्यक्तींसोबत त्यांचा वाद झाला. यावेळी आरीफ शाह यांनी त्यांच्या मुलास चेतावनी दिल्यामुळे त्याने त्याच्याजवळ असलेल्या धारदार शस्त्राने निनाद शाह याच्या कपाळावर वार केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याने दि. १ नोव्हेंबर रोजी शनिपेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार हादी आरिफ शाह, आरिफ शाहर युसूफ शाह (दोघ रा. जोशीपेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ उमेश ठाकूर हे करीत आहे



