Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महामार्गावर खोदलेला खड्डा बनला काळ : दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू !
    क्राईम

    महामार्गावर खोदलेला खड्डा बनला काळ : दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू !

    editor deskBy editor deskNovember 3, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    पाचोरा ते जळगाव महामार्गावरील गोराडखेडा गावाजवळ पी. जे. रेल्वेचे काम सुरू आहे. याठिकाणी रेल्वे प्रशासनाने मोठा खड्डा खोदला असून भलामोठा खड्डा न दिसल्याने एक २५ वर्षीय तरुण त्या खड्ड्यात पडल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ३१ ऑक्टोबरला रात्री घडली. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील खडकदेवळा येथील विकी संजय निकम (वय २५) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, विकी निकम यांच्यासह विवेक प्रकाश पाटील व सोनू नाईक हे दुचाकी (एमएच १९, सीडी- ४७३९) ने ३१ ऑक्टोबरला रात्री ११ वाजेच्या सुमारास माहिजी येथून खडकदेवळा येथे जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान, पाचोरा ते जळगाव महामार्गावर गोराडखेडा गावानजीक पाचोरा ते जामनेर (पी. जे.) रेल्वेच्या ब्रॉड गेज लाईनेचे काम सुरू असल्याने त्याठिकाणी मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. रात्री अंधारात विकी निकम यास हा खड्ड्या दिसला नाही व दुचाकी थेट त्या खड्ड्यात जावून आदळली. या अपघातात विकी संजय निकम या तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

    त्यांच्यासोबत असलेले विवेक पाटील व सोनू नाईक हे जखमी झाले आहेत. मयत विकी निकम यास रुग्णवाहिका चालक भागवत पाटील यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात, तर जखमींना पाचोरा येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळाचा पो.हे.कॉ. दिलीप वाघमोडे व सहाय्यक फौजदार संजय काळे यांनी पंचनामा केला. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे खडकदेवळा गावांसह पाचोरा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. मयत विकी निकम या अविवाहित तरुणाच्या पश्चात्य वृद्ध आई, एक मोठा भाऊ असा परिवार आहे. विकी निकम हा खडकदेवळा येथे त्यांच्या मामाच्या घरी वास्तव्याला होते. विकी हा जेसीबी चालवत होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    लग्नाला वर्षही पूर्ण नाही, संसाराचा दुर्दैवी अंत : यावलमध्ये पतीने केली पत्नीची हत्या

    November 3, 2026

    कपाळावर धारदार शस्त्राने वार : जोशीपेठेत तरुण गंभीर जखमी; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल !

    November 3, 2026

    रस्त्याच्या बिलावर सहीसाठी १ टक्का कमिशन! १० हजारांची लाच घेताना जिल्हा परिषदेचे दोन अधिकारी ACBच्या जाळ्यात!

    November 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.