Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » लग्नाला वर्षही पूर्ण नाही, संसाराचा दुर्दैवी अंत : यावलमध्ये पतीने केली पत्नीची हत्या
    क्राईम

    लग्नाला वर्षही पूर्ण नाही, संसाराचा दुर्दैवी अंत : यावलमध्ये पतीने केली पत्नीची हत्या

    editor deskBy editor deskNovember 3, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी 

    शहरातील तिरुपती नगर परिसरातील एका पती, पत्नीमध्ये किरकोळ वाद झाला, त्यानंतर पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित पतीला ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील भुसावळ रस्त्यालगत विस्तारित भागात आयेशा नगरमधील तिरुपती नगर परिसरातील रहिवाशी शेख साबीर शेख आमिन यांच्या घर क्रमांक ५७० मध्ये भाडेकरू म्हणून आरिफ खान गनी खान हे राहतात. त्यांचा मोठा मुलगा फरदीन खान अरिफ खान (वय २१) याचे गेल्या वर्षीच लग्न झाले होते. तर, तो आणि त्याची पत्नी मशीराबी फरदीन खान (वय २०) हे दोघे सोमवारी आपल्या घरीच होते. तर कुटुंबातील इतर लोक एका लग्न समारंभासाठी गावातच गेले होते. दरम्यान, दुपारी पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि या वादातून फरदीन खान याने त्याच्या पत्नीच्या छातीवर बसून तिचा गळा दाबून तिची हत्या केली व तो फरार झाला. सायंकाळी हा प्रकार उघडकीस आल्याने तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, पोलिस उपनिरिक्षक मैनोद्दीन सय्यद, हवालदार वासुदेव मराठे, वसीम तडवी, एजाज गवळी, अर्षद गवळी, अलाउद्दीन तडवी हे घटनास्थळी दाखल झाले. तसेच हा गुन्हा केल्यानंतर फरदीन हा पळून जाण्याच्या बेतात असतानाच त्याला साकळी गावाजवळून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तर घटनास्थळाचा पंचनामा करून रात्री मृतदेह यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    महामार्गावर खोदलेला खड्डा बनला काळ : दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू !

    November 3, 2026

    कपाळावर धारदार शस्त्राने वार : जोशीपेठेत तरुण गंभीर जखमी; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल !

    November 3, 2026

    रस्त्याच्या बिलावर सहीसाठी १ टक्का कमिशन! १० हजारांची लाच घेताना जिल्हा परिषदेचे दोन अधिकारी ACBच्या जाळ्यात!

    November 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.