
जळगाव : प्रतिनिधी
हर्बल लाईफ कंपनीत गुंतवणुकीचे अमिष दाखवून १ कोटी २३ लाखात फसवणूक करणारा मुख्य संशयित दीपक रुपानी हा दुरंतो एक्सप्रेसने प्रवास करीत असल्याची माहिती आर्थीक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. दरम्यान, त्याचा रेल्वेत पाठलाग सुरु असतांना बडनेरा रेल्वे स्टेशनवर गाडीचा वेग कमी होताच रुपानी हा गाडीतून उडी मारुन पळून जात असतांना पोलिसांनी त्याला पाठलाग करीत मुसक्या आवळल्या.
हर्बल लाईफ कंपनीत गुंतवणुकीचे अमिषदाखवून १ कोटी २३ लाख ८६ हजारात फसवणुक करण्यात आली होती. या गुन्ह्यातील मुख्य संशयित दिपेश रुपानी हा गेल्या वर्षभरापासून फरार होता. त्याचा आर्थीक गुन्हे शाखेकडून राजस्थान, जोधपुर, अमरावती, खामगाव व बडनेरा या ठिकाणी वेळोवेळी शोध घेतला. मात्र तो राहण्याचे ठिकाणे बदलवित असल्यामुळे तो पोलिसांना मिळून येत नव्हता. तसेच वारंवार दुसऱ्या व्यक्तींच्या नावाने सीमकार्ड आणि मोबाईल क्रमांक बदलावून तो पोलिसांना गुंगारा देत होता. तसेच अलीकडेच त्याने टक्कल करुन पेहरावात बदल केल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन संशयित रुपानी याचे वेगवेगळ्या पेहरावातील फोटो तयार करुन त्यानुसार त्याचा शोध सुरु ठेवला.
संशयित दिपेश रुपाणी हा गोवा येथे गेल्याची माहिती आर्थीक गुन्हे शाखेचे पोनि नितीन पाटील यांना मिळाली. तसेच तो मुंबई ते नागपुर असा दुरांतो एक्सप्रेसने प्रवास करीत असल्याची कळताच त्यांनी सपोनि ईश्वर पाटील उपनिरीक्षक विजय निकुंभ, पोहेकॉ प्रितमकुमार पाटील, समाधान पाटील, घनशाम पवार, विजय शिरसाठ यांचे पथक भुसावळ येथे रवाना केले. गुंतवणुकीचे अमिष दाखवून दीपेश कमलेश रुपानी व आकाश सुरजमलजी सिद्ध उर्फ आकाश वर्मा यांनी कोणाची फसवणुक केली असल्यास, त्या गुंतवणुक दारांनी आर्थीक गुन्हे शाखेत संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे
दुरांतो एक्सप्रेसला भुसावळ येथे पाच मिनिट थांबा असल्यामुळे उपनिरीक्षक विजय निकुंभ व प्रितमकुमार पाटील यांच्याकडून
संशयितांचा गाडीत शोध सुरु होता. मात्र तो गाडीत मिळून आला नाही. दरम्यान, बडनेरा रेल्वे स्टेशनवर गाडीचा वेग कमी होताच संशयित दिपेश रुपानी गाडीतून उडी मारुन प्लॅटफॉर्मवरुन पळून जात असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्याचा पाठलाग करीत मुसक्या आवळल्या



