Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात टी.बी. हॉस्पिटलमधील कचरा संकलनाच्या कामाला गती; आयटीआयजवळील रॅम्प तातडीने बंद करण्याचे उपमहापौरांचे निर्देश!
    जळगाव

    जळगावात टी.बी. हॉस्पिटलमधील कचरा संकलनाच्या कामाला गती; आयटीआयजवळील रॅम्प तातडीने बंद करण्याचे उपमहापौरांचे निर्देश!

    editor deskBy editor deskOctober 19, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील कचरा संकलन आणि मोजणीची प्रक्रिया अधिक सुव्यवस्थित करण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेचे उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. टी.बी. हॉस्पिटल येथील रॅम्पचे काम पूर्ण झाले असून, आयटीआयजवळील सुरू असलेला रॅम्प तातडीने बंद करून टी.बी. हॉस्पिटल येथील रॅम्पवर कचरा संकलन व मोजणीचे काम सुरू करण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.

    उपमहापौर मनोज चौधरी यांनी यासंदर्भात महानगरपालिका आयुक्तांना लेखी निवेदन दिले आहे. शहरातील विविध तीन ठिकाणी कचरा संकलन व मोजणीसाठी रॅम्प उभारण्याचे काम सुरू आहे. या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली असता, टी.बी. हॉस्पिटल येथील रॅम्पचे काम पूर्ण झाल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, आयटीआयजवळील रॅम्प अद्याप कार्यरत असल्याने कचरा संकलन आणि मोजणीच्या कामात अधिक सुसूत्रता आणण्यासाठी हा रॅम्प तातडीने बंद करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

    टी.बी. हॉस्पिटल येथील रॅम्पवर कचरा संकलन व मोजणीचे काम तातडीने सुरू करण्यासाठी आयटीआयजवळील रॅम्पवरील कामकाज पुढील दोन ते तीन दिवसांत बंद करून टी.बी. हॉस्पिटल येथील रॅम्प कार्यान्वित करावा, अशी मागणी उपमहापौर मनोज चौधरी यांनी केली आहे. यासाठी संबंधित विभागाला तातडीने सूचना देऊन आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.

    महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे शहरातील कचरा संकलन आणि मोजणी प्रक्रियेत सुसूत्रता येण्यास मदत होईल. तसेच शासकीय आयटीआयजवळील परिसरातील विद्यार्थी आणि नागरिकांना होणारा त्रास कमी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. आता उपमहापौरांच्या निवेदनानंतर महानगरपालिका प्रशासन यावर किती तत्परतेने कार्यवाही करते, याकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    माणुसकीला काळिमा : तरुणाला नग्न करून अमानुष मारहाण; पार्श्वभागात पेट्रोल टाकल्याचा संतापजनक प्रकार!

    October 19, 2026

    बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ? चंद्रपुरातील भाषणाने मोठा वाद!

    October 19, 2026

    ….आता राज्यात राष्ट्रपती राजवट लावा!:संजय राऊतांची मागणी !

    October 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.