Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » माणुसकीला काळिमा : तरुणाला नग्न करून अमानुष मारहाण; पार्श्वभागात पेट्रोल टाकल्याचा संतापजनक प्रकार!
    क्राईम

    माणुसकीला काळिमा : तरुणाला नग्न करून अमानुष मारहाण; पार्श्वभागात पेट्रोल टाकल्याचा संतापजनक प्रकार!

    editor deskBy editor deskOctober 19, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लातूर : वृत्तसंस्था

    लातूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाला नग्न करून त्याला पट्ट्याने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे तर, अमानुषतेची सर्व हद्द पार करत या तरुणाच्या पार्श्वभागात पेट्रोल टाकल्याचा भयंकर प्रकारही समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण लातूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

    या मारहाणीचा संपूर्ण थरार आरोपींनी स्वतःच्या मोबाईलमध्ये चित्रित केला. मारहाण करणाऱ्या या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळक्यानेच नंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावरील विविध ग्रुप्सवर व्हायरल केला. हा अत्यंत विचलित करणारा व्हिडिओ समोर आल्यानंतरच या भयंकर गुन्ह्याला वाचा फुटली आणि हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.

    या गंभीर घटनेची दखल घेत स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. मात्र, या गुन्ह्यात सामील असलेले अन्य तीन ते चार आरोपी अद्याप फरार असून, पोलिस पथके त्यांचा कसून शोध घेत आहेत.

    प्राथमिक माहितीनुसार, मारहाणीची ही अमानुष घटना काही महिन्यांपूर्वी घडली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, या तरुणाला मारहाण करण्यामागचे नेमके कारण काय, ही घटना नेमकी कधी घडली आणि आताच हा व्हिडिओ व्हायरल करण्यामागचा आरोपींचा उद्देश काय होता, याचा सखोल तपास सध्या पोलीस करत आहेत. या भयंकर प्रकारामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावात टी.बी. हॉस्पिटलमधील कचरा संकलनाच्या कामाला गती; आयटीआयजवळील रॅम्प तातडीने बंद करण्याचे उपमहापौरांचे निर्देश!

    October 19, 2026

    झेंडूच्या पिकाआड गांजाची शेती : २२ लाखांचा गांजा जप्त; शेतकरी पोलिसांच्या ताब्यात!

    October 19, 2026

    बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ? चंद्रपुरातील भाषणाने मोठा वाद!

    October 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.