Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ? चंद्रपुरातील भाषणाने मोठा वाद!
    क्राईम

    बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ? चंद्रपुरातील भाषणाने मोठा वाद!

    editor deskBy editor deskOctober 19, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चंद्रपूर : वृत्तसंस्था

    प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी चंद्रपूरमध्ये पोलिसांवर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका करत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रकल्पग्रस्त आंदोलकांना पोलिसांकडून नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप करत कडू यांनी संताप व्यक्त केला. तसेच पोलिस प्रशासन वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडकडून पैसे घेत असल्याचा दावा देखील त्यांनी केला. त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आणि वापरलेल्या भाषेमुळे आता मोठा वाद निर्माण झाला आहे.

    चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांतील कोळसा खाणींमुळे बाधित झालेल्या गावकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात ‘त्रिशूळ आंदोलन’ पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून चंद्रपूरमधील कोरपना तालुक्यातील पैनगंगा कोळसा खाण परिसरापासून ते घुग्घुस शहरातील कारगिल चौकापर्यंत एक भव्य मोर्चा काढण्यात आला होता.

    या पदयात्रेत आमदार बच्चू कडू स्वतः सहभागी झाले होते. तब्बल 15 किलोमीटरचा पायी प्रवास करून हा मोर्चा घुग्घुस येथील कारगिल चौकात पोहोचला. तिथे या मोर्चाचा समारोप करताना कडू यांनी उपस्थितांना संबोधित केले. याच भाषणादरम्यान त्यांनी आक्रमक होत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्लाबोल केला.

    आपल्या भाषणात कडू यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले. पोलिस प्रशासन वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडकडून (WCL) पैसे घेत असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, आपल्या न्याय्य हक्कासाठी लढणाऱ्या प्रकल्पग्रस्त आंदोलकांना पोलिसांकडून धमकावले जात आहे, असे सांगत त्यांनी संताप व्यक्त केला. पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांनी पोलिसांसाठी अपशब्दांचाही वापर केला. प्रामाणिक अधिकाऱ्यांचा अपवाद वगळता, जे पोलिस विनाकारण कार्यकर्त्यांवर दादागिरी करतील त्यांना सोडणार नाही, असा थेट इशारा बच्चू कडू यांनी दिला. एखाद्या ठाणेदाराने आंदोलकांना नाहक त्रास दिल्यास त्याला जाब विचारला जाईल आणि बघून घेऊ, अशी धमकीही त्यांनी यावेळी दिली. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर आवाज उठवताना कडू यांनी वापरलेल्या या वादग्रस्त भाषेमुळे सध्या मोठी चर्चा सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावात टी.बी. हॉस्पिटलमधील कचरा संकलनाच्या कामाला गती; आयटीआयजवळील रॅम्प तातडीने बंद करण्याचे उपमहापौरांचे निर्देश!

    October 19, 2026

    झेंडूच्या पिकाआड गांजाची शेती : २२ लाखांचा गांजा जप्त; शेतकरी पोलिसांच्या ताब्यात!

    October 19, 2026

    माणुसकीला काळिमा : तरुणाला नग्न करून अमानुष मारहाण; पार्श्वभागात पेट्रोल टाकल्याचा संतापजनक प्रकार!

    October 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.