Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सागवान तस्करीचा बेत फसला; वन विभागाच्या पथकाला पाहताच तस्कर दुचाकी सोडून पसार!
    क्राईम

    सागवान तस्करीचा बेत फसला; वन विभागाच्या पथकाला पाहताच तस्कर दुचाकी सोडून पसार!

    editor deskBy editor deskOctober 5, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा : प्रतिनिधी 

    अडावद वन विभागाच्या फिरत्या पथकाने दि.३ ऑक्टोंबर २०२६ रोजी  सकाळी पाटचारीवर गस्त घालताना विना नंबरच्या दुचाकीवरून सागवानी अनघड बेलनाची अवैध वाहतूक करून सागवानी लाकडाची तस्करीचा बेत हाणून पाडला. यात वन विभागाने १ लाख ४० हजारांच्या ५ दुचाकी आणि २० हजार ६२५ रुपयांचे अनघड बेलन असा १ लाख ६० हजार ६२५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, वनरक्षक आर. एस. निकुंभे यांना ३ रोजी पहाटे ५ वाजेचा सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीवरून वनपाल योगेश साळुंखे व अडावद  राऊंड स्टाफसह, बोरमळी ते अडावद पाटचारी रस्त्याने पथक सामूहिक गस्त घालत होते. या वेळी अज्ञात व्यक्ती विना क्रमांकाच्या ५ दुचाकीवरुन सागाचे अनघड बेलन वाहतूक करतांना दिसले. त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता ते व्यक्ती मुद्देमाल व दुचाकी रस्त्याचा कडेला फेकून पसार झाले.

    त्यांच्याकडून ९० हजारांच्या तीन सीबी शाईन, ५० हजारांच्या दोन हिरो स्पलेंडर यासह २० हजार ६२५ रुपयांचे लहान, मोठे १ हजार २५ नग अनघळ बेलन असा ऐकूण १ लाख ६० हजार ६२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा वन गुन्हा वनरक्षक आर. एस. निकुंभे यांच्याकडे दाखल करण्यात आला असून तपास वनपाल योगेश साळुंखे करत आहेत. ही कारवाई उप वनसंरक्षक सौरिष सहाय, सहाय्यक वनसंरक्षक एम. बी. पाटील, वनक्षेत्रपाल प्रशांत साबळे यांच्या मार्गदर्शनात वनपाल योगेश साळुंखे, वनरक्षक राकेश निकुंभे, वनमजूर संजय बेलदार, प्रकाश सपकाळे, बापू कोळी, संजय तडवी, योगेश सपकाळे, राजेश जोशी, हर्षल जोशी, भिकन तडवी, इतबार तडवी, राजू पाटील यांनी केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जन्मदात्यांनीच घेतला मुलाचा जीव : दारूच्या व्यसनावरून मारहाण, उपचारांअभावी मृत्यू !

    October 5, 2026

    अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

    October 5, 2026

    मोबाईल बंद करून लपला, पण पोलिसांच्या तांत्रिक तपासातून सापडला; पाच महिन्यांनी अल्पवयीन मुलीचा शोध

    October 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.