Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चोरीचा माल खरेदी करणाऱ्या भंगार व्यावसायिकांवर कारवाई; 75 हजारांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात
    Uncategorized

    चोरीचा माल खरेदी करणाऱ्या भंगार व्यावसायिकांवर कारवाई; 75 हजारांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात

    editor deskBy editor deskSeptember 30, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील कॉपर वायर चोरी, इलेक्ट्रिक मोटार चोरी, महावितरणच्या केबल तसेच सोलर केबल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि चोरीचा मुद्देमाल खरेदी-विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याच्या उद्देशाने पोलिसांनी विशेष मोहीम राबविली. या मोहिमेत भंगार दुकानांची तपासणी करून चोरीचा संशय असलेला सुमारे 75 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्याच्या पथकाने परिसरातील भंगार खरेदी-विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी केली.

    पोलिसांनी भोकरी तसेच लोहार्‍याच्या कु-हाड गावातील भंगार दुकानांवर तपासणी केली. या कारवाईदरम्यान विविध दुकानांमधून कॉपर वायर व अॅल्युमिनियमच्या तारा असा चोरीचा संशयित मुद्देमाल आढळून आला.

    पोलिसांच्या माहितीनुसार, करीम नदी काकर यांच्या भंगार दुकानातून सुमारे 32 हजार रुपये किमतीची 32 किलो कॉपरची तार, हकीम आब्बास काकर यांच्या दुकानातून सुमारे 9 हजार रुपये किमतीची 10 किलो कॉपरची तार, तर राजू उस्मान काकर यांच्या भंगार दुकानातून सुमारे 1 हजार 400 रुपये किमतीची 14 किलो अॅल्युमिनियमची तार जप्त करण्यात आली.

    तसेच लोहार्‍याच्या हद्दीतील कु-हाड गावातील अब्दुल हकीम काकर यांच्या भंगार दुकानातून सुमारे 32 हजार रुपये किमतीची 32 किलो कॉपरची तार आढळून आली. अशा प्रकारे कॉपर व अॅल्युमिनियमच्या तारांसह सुमारे 75 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

    जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाबाबत संबंधित भंगार दुकानदारांकडे आवश्यक कागदपत्रे तसेच खरेदी-विक्रीचा पुरावा मागण्यात आला. मात्र समाधानकारक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र पोलिस अधिनियमातील कलम 124 अन्वये चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर मुद्देमालाचा चोरीच्या इतर गुन्ह्यांशी संबंध आहे का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

    या कारवाईमुळे चोरीचा माल खरेदी-विक्री करणाऱ्या भंगार व्यावसायिकांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः शेतकऱ्यांच्या शेतातील कॉपर वायर, इलेक्ट्रिक मोटारी, महावितरणच्या केबल तसेच सोलर केबल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी भंगार बाजारातील व्यवहारांची तपासणी करण्यावर पोलिसांनी भर दिला आहे.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, चाळीसगाव परिमंडळाचे पोलीस अधिकारी तसेच पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

    पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्यासह पोलीस कर्मचारी अतुल पवार, अभिजित निकम, दीपक अहिरे, प्रवीण देशमुख, भारत पाटील, शाम हटकर, मनोज वडगुजर आणि नामदेव इंगळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मराठवाड्यात वादळी पावसाचा तडाखा; वीज कोसळून ५ जणांचा मृत्यू!

    September 18, 2026

    सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध !

    September 15, 2026

    महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर : २२ जिल्ह्यांत सरींची शक्यता; विदर्भासह १४ जिल्ह्यांत उघडीप !

    September 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.