Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रात्रभर विहिरीत शोधमोहीम; १२ तासांनी विवाहितेचा मृतदेह बाहेर
    क्राईम

    रात्रभर विहिरीत शोधमोहीम; १२ तासांनी विवाहितेचा मृतदेह बाहेर

    editor deskBy editor deskSeptember 30, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी 

    सासरच्या जाचाला कंटाळून ३५ वर्षीय विवाहितेने राहत्या घराजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना जामनेर तालुक्यातील एकुलती येथे सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, जिजाबाई देवानंद सकट (वय ३५) असे मवत विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, जिजाबाई सकट यांना सासरचा जाच असह्य झाल्याने त्यांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या विहिरीत उडी घेतली. विहिरीत पाणी असल्याने त्यांना तातडीने विहिरीबाहेर काढणे शक्य झाले नाही. पंपाद्वारे विहिरीतील पाणी उपसल्यानंतर तब्बल बारा तासांनी त्यांचा मृतदेहच बाहेर काढण्यात आला.

    दरम्यान, याप्रकरणी मयत जिजाबाई यांच्या आई इंदुबाई रघुनाथ चंदनशिव (रा. ढालसिंगी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती देवानंद युवराज सकट व सासरे युवराज सुखदेव सकट यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, मयत जिजाबाई यांचे मृतदेहाचे पहूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तपास उपनिरीक्षक नंदकुमार शिंबरे करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्टिफिकेटपेक्षा कौशल्याचा प्रत्यक्ष वापर महत्त्वाचा : श्रीकांत धिवरे

    September 29, 2026

    धरणगावात शिवशक्ती वाहतूक सेनेची तालुका कार्यकारिणी जाहीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र

    September 29, 2026

    पतीसह दोन मुलांच्या मृत्यूनंतर शिक्षिकेचाही मृत्यू; तीन महिन्यांत कुटुंबावर काळाचा घाला

    September 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.