
मुक्ताईनगर : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावामध्ये सहा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना २७ सप्टेंबरला दुपारी साडेचार वाजता घडली. याप्रकरणी सतरा वर्षीय मुलावर मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावामध्ये घराचे बांधकाम सुरू असताना दोन्ही बहिणी लपंडाव खेळत होत्या. तर, दुसऱ्या माळ्यावर सहा वर्षीय मुलगी जाऊन लपली होती. याच ठिकाणी काम करत असलेल्या १७ वर्षीय मुलाने त्या मुलीवर अत्याचार केला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांनी दिली



