Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » किनगाव-मालोदमध्ये वीज तार चोरांचा धुमाकूळ : ११ जण ताब्यात
    क्राईम

    किनगाव-मालोदमध्ये वीज तार चोरांचा धुमाकूळ : ११ जण ताब्यात

    editor deskBy editor deskSeptember 26, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी 

    तालुक्यातील किनगाव व मालोद शेतशिवारामध्ये वीज वितरण कंपनीचे तार चोरी करून त्याची विल्हेवाट लावताना काही चोरटे आढळले. मंगळवारी रात्री हे चोरटे किनगावच्या एका भंगार व्यवसायिकास हे साहित्य देताना शेतकऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले. घटनास्थळी रात्रीच पोलिसांनी चौघांना ताब्यात घेत मुद्देमाल आणि वाहन हस्तगत केले. तर रात्री पोलिसांनी सर्च मोहीम राबवून पुन्हा सात केबल चोरी करणाऱ्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी ११ जण सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. यामुळे वीज वितरण कंपनीचे तार, केबल चोरीचे मोठे रॅकेटच उघडकीस आले आहे.

    किनगावपासून मालोद जाणाऱ्या रस्त्यावरील शेत शिवारात वीज वितरण कंपनीचे तारांचे तुकडे करून त्यांचे गड्ढे बांधून चोरी करून नेताना नागरिकांना सुपडू हमजान तडवी (वय ३३, रा. मालोद, हल्ली मुक्काम काजीपुरा सावदा ता. रावेर), करीम नशीर तडवी (वय २४, रा. तडवी वाडा, नायगाव), अलाउद्दीन मजीद तडवी (वय २३ रा. दर्याजवळ, नायगाव) यांच्याकडून एका चारचाकी वाहनातून तार घेण्यासाठी आलेला किनगाव येथील भंगार व्यवसायिक आरिफ युसुफ मन्यार (वय ४२, रा. सोनार गल्ली, किनगाव बुद्रुक) हे नागरिकांना आढळले. यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी आणि नागरिकांनी घटनास्थळी त्यांना पकडून ठेवले व पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पो.नि. रंगनाथ धारबळे, सहाय्यक फौजदार वसंतराव बेलदार, हवालदार संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी, सचिन पाटील या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर वीज वितरण कंपनीचे लघुदाब, ११ के.व्ही.ए. व ३३ के. व्ही.ए.चे कटिंग केलेले तार मिळाले. या चौघांनी हे वीज तार एका मक्तेदाराचे चोरी केल्याचा संशय आहे. या चौघांना अनिल उर्फ शेखर आत्माराम चौधरी (रा. साकळी) यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली आहे. तपास पो.नि. रंगनाथ घारबळे यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार वसंतराव बेलदार करत आहेत.

    तर, केबल चोरीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून मालोद गावातुन आरिफ तडवी, हैदर तडवी, अफसर तडवी, कुदबुद्दीन तडवी, विनोद तडवी, सलीम तडवी व एक १७ वर्षीय अल्पवयीन अशा ७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भिलपुरा चौकातील दर्ग्यावर महापौरांसह मान्यवरांच्या हस्ते मानाची चादर अर्पण : अनेक वर्षांची परंपरा राहिली कायम

    September 26, 2026

    साकरे शिवारात विजेचा कहर : कडकडाटासह वीज कोसळली; १५ शेळ्या जागीच ठार !

    September 24, 2026

    बंद घराचे कुलूप तोडले, कपाट फोडले; ५१ हजारांची रोकडसह सोन्याचे दागिने लंपास!

    September 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.