Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भिलपुरा चौकातील दर्ग्यावर महापौरांसह मान्यवरांच्या हस्ते मानाची चादर अर्पण : अनेक वर्षांची परंपरा राहिली कायम
    जळगाव

    भिलपुरा चौकातील दर्ग्यावर महापौरांसह मान्यवरांच्या हस्ते मानाची चादर अर्पण : अनेक वर्षांची परंपरा राहिली कायम

    editor deskBy editor deskSeptember 26, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव :  प्रतिनिधी 

    जळगाव शहरात अनंत चतुर्दशीनिमित्त श्री गणेशाचे विसर्जन शुक्रवारी अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडले. जळगाव शहर महानगरपालिकेच्या मानाच्या गणपतीच्या विसर्जनापूर्वी वर्षांनुवर्षांची सामाजिक ऐक्याची आणि धार्मिक सौहार्दाची परंपरा यंदाही तितक्याच श्रद्धेने जपण्यात आली. विसर्जन मिरवणुकीदरम्यान भिलपुरा चौकातील ऐतिहासिक ‘हजरत पीर लालशहा सरकार’ दर्ग्यावर महानगरपालिकेच्या वतीने जिल्हाधिकारी रोहन घुगे, महापौर दीपमाला काळे व अधिकाऱ्यांच्या हस्ते मानाची चादर अर्पण करण्यात आली. यानंतर विसर्जन मिरवणूक मार्गस्थ झाल्या.

    या प्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे, महापौर दीपमाला काळे, मनपा आयुक्त आदित्य जीवने, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि प्रांताधिकारी योगेश कुमार मीना यांनी दर्ग्यात उपस्थित राहून ही पारंपरिक विधी पूर्ण केली. चादर अर्पण केल्यानंतर महापालिकेच्या मानाच्या गणपतीची सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अतिशय मंगलमय वातावरणात महाआरती करण्यात आली. महाआरती संपन्न झाल्यानंतर श्री गणेशमूर्ती विसर्जन मार्गाने पुढे रवाना झाली.

    महाआरतीला उपमहापौर मनोज चौधरी, तहसीलदार शितल राजपूत, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड, उपायुक्त धनश्री शिंदे, उपायुक्त पंकज गोसावी, पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, सामाजिक कार्यकर्ते अयाज अली यांच्यासह महानगरपालिका व पोलीस प्रशासनातील विविध अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    किनगाव-मालोदमध्ये वीज तार चोरांचा धुमाकूळ : ११ जण ताब्यात

    September 26, 2026

    साकरे शिवारात विजेचा कहर : कडकडाटासह वीज कोसळली; १५ शेळ्या जागीच ठार !

    September 24, 2026

    बंद घराचे कुलूप तोडले, कपाट फोडले; ५१ हजारांची रोकडसह सोन्याचे दागिने लंपास!

    September 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.