Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश !
    जळगाव

    सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश !

    editor deskBy editor deskSeptember 23, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्याबरोबरच थकबाकी व चालू वीजबिल वसुलीवर विशेष लक्ष केंद्रित करावे तसेच ग्राहकांच्या तक्रारींची तत्परतेने दखल घेऊन त्या वेळेत निकाली काढाव्यात, असे निर्देश महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी दिले.

    येथील विद्युत भवनात मंगळवारी (२२ सप्टेंबर) आयोजित जळगाव परिमंडलाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी, अधीक्षक अभियंता मदन सांगळे, अधीक्षक अभियंता संजय सरग, अधीक्षक अभियंता सायस दराडे यांच्यासह परिमंडलातील सर्व विभागीय कार्यकारी अभियंते, विविध विभागांचे प्रमुख आणि लेखा अधिकारी उपस्थित होते.

    संचालक राजेंद्र पवार म्हणाले की, आगामी रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कृषिपंपांसाठी सुरळीत वीजपुरवठा व्हावा यासाठी उपकेंद्रातील सर्व यंत्रणा सुस्थितीत ठेवावी. नादुरुस्त झालेली रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर) ठरवून दिलेल्या कालमर्यादेत तातडीने बदलून द्यावीत. वितरण रोहित्रे वारंवार नादुरुस्त होऊ नयेत यासाठी अनधिकृत वीजवापरावर तात्काळ कारवाई करावी. वीजपुरवठा खंडित झाल्यास तो लवकरात लवकर पूर्ववत करावा तसेच सर्व क्षेत्रीय अभियंते व कर्मचाऱ्यांनी वीजग्राहकांच्या तक्रारींना तात्काळ प्रतिसाद दिला पाहिजे. ग्राहकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष किंवा कामात दिरंगाई केल्यास ती अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
    ग्राहकांना अचूक वीजबिल तसेच स्मार्ट मीटरचे सर्व फायदे देण्यासाठी सर्व सदोष मीटर्स तातडीने बदला. व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांचे जुने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहिमेला वेग देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. महावितरणचा संपूर्ण आर्थिक डोलारा वीजबिल वसुलीवरच अवलंबून असल्याने चालू बिलांसह थकबाकी वसुलीसाठी प्रभावी मोहीम राबवावी, तसेच थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेले ग्राहक अनधिकृतपणे वीज वापरत असल्यास त्यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई करावी, असे निर्देश श्री. पवार यांनी दिले. यावेळी त्यांनी’स्मार्ट योजना’, ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ आणि ‘वाहिनी विलगीकरण’ या योजनांचाही आढावा घेतला.

    वीजग्राहकांना जलद व पारदर्शक सेवा देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात महावितरणकडून विशेष सेवा कक्ष सुरू करण्यात आले असून येत्या १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ‘सेवा सेतू’ आणि ‘सेवा संकल्प अभियान’ राबवले जात आहे. या अभियानांतर्गत ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजना’, ‘स्मार्ट योजना’, ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ आणि ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ यासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी, आर्थिक फायदे व सौर संच बसविण्याच्या प्रक्रियेचे मार्गदर्शन जागेवरच केले जात आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन संचालक श्री. राजेंद्र पवार यांनी केले.

    उपकेंद्राचे काम मुदतीत पूर्ण करा
    संचालक राजेंद्र पवार यांनी तालुक्यातील शिरसोली येथे एआयआयबी योजनेतून सुरू असलेल्या ३३ केव्ही उपकेंद्राच्या कामाची पाहणी केली. उपकेंद्राची स्थापत्य व तांत्रिक कामे दर्जेदार करा. दिलेल्या मुदतीत उपकेंद्राचे काम पूर्ण करा, असे निर्देश श्री.पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    निंभोरा पोलिसांचा धडाका; घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश, ५ संशयित आरोपी अटकेत !

    September 23, 2026

    जनगणना २०२७ प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण सत्र

    September 23, 2026

    बॉल घेतला, पैसे दिले अन् क्षणात सोन्याची पोत हिसकावली : रायसोनी नगरात धक्कादायक चोरी

    September 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.