Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » निंभोरा पोलिसांचा धडाका; घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश, ५ संशयित आरोपी अटकेत !
    क्राईम

    निंभोरा पोलिसांचा धडाका; घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश, ५ संशयित आरोपी अटकेत !

    editor deskBy editor deskSeptember 23, 2026No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    निंभोरा पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करत सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून तब्बल ६ लाख १६ हजार ८१० रुपये किमतीचा सोने-चांदीचे दागिने आणि रोकड असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे निंभोरा परिसरातील तीन घरफोडीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

    निंभोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खिडकी, ता. रावेर येथील रहिवासी महिला शहनाज शेख अख्तर या कुटुंबासह बाहेरगावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला होता. १३ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत झालेल्या या घरफोडीत चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण ६ लाख ३२ हजार ८१० रुपयांचा ऐवज लंपास केला होता.

    याप्रकरणी निंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८६/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ), ३३१(३), ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगावचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी निंभोरा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक मीरा देशमुख यांना गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.

    त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी, गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान एका आरोपीचा मुंबईशी संबंध असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस पथकाने मुंबई येथून एका आरोपीस ताब्यात घेतले, तर खिडकी, ता. रावेर येथून अन्य चार आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये नवाज शेख शरीफ (वय २३), अशपाक ऊर्फ अट्टया शेख रमजान (वय ३२), शहादत बेग रफिक बेग (वय २२), चेतन विलासर जाधव (वय २९) आणि शकील बेग साबीर बेग (वय ३२), सर्व रा. खिडकी, ता. रावेर यांचा समावेश आहे.

    ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपी नवाज शेख याची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. चौकशीदरम्यान त्याने खिडकी गावातील मूळ गुन्ह्याव्यतिरिक्त आणखी दोन ठिकाणी घरफोडी केल्याची माहिती दिली. या गुन्ह्यांमध्ये आरोपी चेतन जाधव याचा सहभाग निष्पन्न झाला. अटक आरोपींकडून चौकशी केल्यानंतर शहादत बेग, अशपाक ऊर्फ अट्टया शेख आणि शकील बेग यांनीही या घरफोड्यांमध्ये सहभाग असल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

    तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेल्या ऐवजापैकी ५ लाख ७९ हजार ३१० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. यात सोन्याची पोत, कानातील झुमके, अंगठ्या, चांदीचे फुलतोडे, गुंज्या, बांगड्या, हातातील कडे यांसह इतर दागिने तसेच रोकडचा समावेश आहे. तसेच आरोपींकडून अन्य दोन घरफोडींची माहिती मिळाल्यानंतर त्या गुन्ह्यांतील चोरीचा मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला. या कारवाईत सोन्याच्या बाळ्या, चांदीच्या लक्ष्मी, शारदा, बालगोपाल व गणेशाच्या चांदीच्या मूर्ती यांसह विविध दागिने आणि रोकड जप्त करण्यात आली. अशा प्रकारे निंभोरा पोलिसांनी तीन घरफोडीच्या गुन्ह्यांतील एकूण ६ लाख १६ हजार ८१० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

    या कारवाईसाठी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलिस अधिकारी फैजपूर अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी मीरा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने काम केले. तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक ए. एम. ढाकणे, तसेच ममता आर. तडवी आणि पोलिस तपास पथकातील पोलीस कर्मचारी रिजवान पिंजारी, अविनाश पाटील, सुभाष शिंदे, परेश सोनवणे, किरण जाधव, सफराज तडवी यांच्यासह अन्य अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, त्यादृष्टीने पुढील तपास सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश !

    September 23, 2026

    जनगणना २०२७ प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण सत्र

    September 23, 2026

    बॉल घेतला, पैसे दिले अन् क्षणात सोन्याची पोत हिसकावली : रायसोनी नगरात धक्कादायक चोरी

    September 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.