Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चोपडा तालुक्यात खळबळ : जवानावर दोघांचा चाकूने हल्ला !
    क्राईम

    चोपडा तालुक्यात खळबळ : जवानावर दोघांचा चाकूने हल्ला !

    editor deskBy editor deskSeptember 22, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा : प्रतिनिधी 

    तालुक्यातील अकुलखेडा येथील रहिवासी असलेल्या राज दीपक धनगर (वय २३) या सीआरपीएफ जवानावर पूर्व वैमानास्यातून दोन जणांनी चाकूने हल्ला केला. यात राज धनगर हे गंभीर जखमी झाले आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार,  सीआरपीएफमधील जवान राज दीपक धनगर हे २१ रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास अकुलखेडा येथील बस स्टॅन्ड परिसरात गेले होते. या वेळी त्यांच्यावर अकुलखेडा येथील दोघा अज्ञातांनी चाकूने हल्ला केला. यात राज दीपक धनगर हे जवान गंभीर जखमी झाले. आहेत. त्यांना तत्काळ चोपडा येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. परंतु, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तत्काळ जळगाव येथे हलवण्यात आले आहे.

    दरम्यान, मिळालेल्या माहितीच्या आधारे शहर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. तर, घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी जखमी जवान राज धनगर ज्या शहरातील खासगी रुग्णालयात दाखल झाले, तेथे जावून भेट दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    निवडणूक कामात बनावट रेल्वे तिकिटांचा ‘खेळ’ : तत्कालीन मंडळ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल !

    September 22, 2026

    जामनेरमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू; ‘त्या’ रिक्षाचा आणि अज्ञात व्यक्तींचा शोध सुरू!

    September 22, 2026

    अजितदादांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी शरद पवारांची भेट; ‘सिल्वर ओक’वर जळगाव जिल्हा बँकेच्या विषयांवर चर्चा!

    September 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.