Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चोपड्यात गणरायाला निरोप देताना भक्तीचा जल्लोष : लेझीम अन् ढोल-ताशांनी दुमदुमले शहर
    जळगाव

    चोपड्यात गणरायाला निरोप देताना भक्तीचा जल्लोष : लेझीम अन् ढोल-ताशांनी दुमदुमले शहर

    editor deskBy editor deskSeptember 18, 2026No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा : प्रतिनिधी 

    पाच दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यासाठी चोपडा शहर सज्ज झाले असून, गुरुवारी सकाळपासूनच शहरातील विविध गणेश मंडळांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दुपारनंतर तर मेन रोड, बाजारपेठ, गुर्जर अळी तसेच गणेश मंडळांच्या परिसरात महिला, पुरुष, विद्यार्थी, युवावर्ग आणि बालगोपाळांची अक्षरशः गर्दी झाली होती. रात्री उशिरापर्यंत हजारो भाविकांनी शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देत गणरायाचे दर्शन घेतले.

    चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील गणेशमूर्ती पाहण्यासाठीही भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मेन रोड, पाटीलगढी, मल्हारपुरा, पंकज नगर स्टॉप, धनवाडी रोड, माळीवाडा, धनगर गल्ली, ग्रामीण पोलिस ठाणे, शिव कॉलनी, तहसील कार्यालय, शनी मंदिर, गुजराथी गल्ली, नगरपालिका परिसर यासह विविध भागांतील गणेश मंडळांच्या देखाव्यांनी शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. अनेक भाविक मोटारसायकलवरून तर अनेकजण पायी फिरत मंडळांचे देखावे आणि गणरायाचे दर्शन घेत होते.

    यंदा चोपडा शहरात सार्वजनिक तसेच खासगी मिळून तब्बल 74 गणेश मंडळांची नोंद झाली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत गणेशोत्सवाचा उत्साह मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून आला. शहरातील विसर्जन मिरवणुकीचा मार्ग एकच असल्याने सर्व मंडळांच्या मिरवणुका शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे.

    गणेश मंडळांमध्ये यंदा विशेष उत्साह असून, ढोल-ताशे, लेझीम, विविध देखावे आणि सजावटीमुळे विसर्जन मिरवणुकीत मोठा जल्लोष पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चोपडा शहरातील विसर्जन मिरवणुकीकडे जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेचे लक्ष लागले आहे.

    दि. 18 सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता शहर पोलिस ठाण्याजवळील राणी लक्ष्मीबाई गणेश मंडळाची पहिली विसर्जन मिरवणूक सुरू झाली. त्याचवेळी सुंदरगढी येथील शिवतेज मित्र मंडळाची मिरवणूकही सहभागी झाली. आझाद चौकातून दहापीर मुस्तफा बाबा दर्गा-मशिदीजवळून पुढे जात दोन्ही मंडळे सकाळी अकराच्या सुमारास शिवाजी महाराज चौकात दाखल झाली. मनसेचे नेते अनिल वानखेडे, यशवंत चौधरी, श्याम परदेशी, श्याम सोनार, राकेश पाटील, ॲड. धर्मेंद्र सोनार, सौरभ नेवे, सागर नेवे, पार्थ पाटील यांच्यासह महिला भगिनींनी ढोल-ताशांच्या गजरात ठेका धरला. मिरवणुकीत सुमारे 50 शाळकरी मुलींनी आकर्षक लेझीम पथक सादर केले. फेटे परिधान केलेल्या विद्यार्थिनी आणि महिलांच्या सहभागामुळे मिरवणुकीला विशेष आकर्षण प्राप्त झाले. शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या मिरवणुकीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. अनिल वानखेडे हे दरवर्षी पेन येथून आणलेली शाडूमातीची गणेशमूर्ती प्रतिष्ठापित करतात. पर्यावरणपूरक पद्धतीने या मूर्तीचे विधिवत विसर्जन करण्याची परंपराही ते जपत आहेत.

    पोलिसांचा मोठा फौजफाटा

    गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर चोपडा शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मिरवणूक मार्गावर जागोजागी पोलिस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात दिसून आले. दि. 17 रोजी सायंकाळी अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील आणि पोलिस निरीक्षक पवनकुमार देसले यांनी गणेश मंडळांच्या हालचालींवर लक्ष ठेवत पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना चोख बंदोबस्ताबाबत मार्गदर्शन केले. आज दिवसभर चोपडा शहरात गणरायाच्या जयघोषात विसर्जन मिरवणुकांचा जल्लोष रंगणार असून, हजारो भाविकांच्या उपस्थितीत शहर भक्तिमय होणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    संतोष पंडित यांना न्यायालयाचा दिलासा : जामीन मंजूर होताच येरवडा कारागृहातून सुटका !

    September 18, 2026

    गोरे होण्याच्या नादात स्वतःवरच उपचार; शिकाऊ डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू!

    September 18, 2026

    दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा : बोर्ड परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर !

    September 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.