Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » समता नगरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम; परिसरात कायमस्वरूपी CCTV कॅमेऱ्यांची सुविधा!
    जळगाव

    समता नगरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम; परिसरात कायमस्वरूपी CCTV कॅमेऱ्यांची सुविधा!

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 13, 2026Updated:September 13, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    परिसराच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण उपक्रम; मान्यवरांच्या उपस्थितीत CCTV यंत्रणेचा शुभारंभ

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज  : समता नगरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कायमस्वरूपी CCTV कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या CCTV यंत्रणेचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात करण्यात आला.
    या उपक्रमामुळे परिसरातील सुरक्षितता वाढण्यास तसेच सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या अनुचित प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. गणेशोत्सवाच्या काळाबरोबरच वर्षभर परिसराच्या सुरक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी ही सी.सी.टी.व्ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे.

    सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्यांच्या शुभारंभ प्रसंगी रामानंद नगर पोलीस स्टेशनचे सुधाकर सावळे, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष मुकुंद मेटकर,  महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे अध्यक्ष रोहीत निकम, अजित राणे, राकेश लोहार, डी. एन. तिवारी, अनिल अडकमोल, मुकेश शिंदे, नकुल सोनवणे, बाळा सोनार, भावेश बऱ्हाटे, किशोर जाधव, किरण अडकमोल यांची उपस्थिती होती.

    मंडळाच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात आले. सुरक्षित व सुव्यवस्थित परिसर निर्माण करण्याच्या उद्देशाने मंडळाने राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    रूपाली महाजन यांनी घेतला पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा आशीर्वाद; शहर विकासासाठी दिला महत्त्वाचा सल्ला !

    September 13, 2026

    कर्की फाट्यावर अपूर्ण पुलामुळे सर्व्हिस रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य; गणेशमूर्ती नेताना भक्तांना तारेवरची कसरत !

    September 13, 2026

    रिचार्ज अपडेट करताना बँक खात्यावर डल्ला; वृद्धाचे तब्बल १० लाख लंपास

    September 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.