Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पहाटे अंधारात ‘चोरीच्या’ तयारीत बसला; पोलिसांची नजर पडताच उडवाउडवीची उत्तरे!
    क्राईम

    पहाटे अंधारात ‘चोरीच्या’ तयारीत बसला; पोलिसांची नजर पडताच उडवाउडवीची उत्तरे!

    editor deskBy editor deskSeptember 11, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव  : प्रतिनिधी 

    चोरी करण्याच्या उद्देशाने तोंडाला रुमाल बांधून अंधारात लपून संशयास्पदरीत्या बसलेल्या २० वर्षीय तरुणास चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या गस्ती पथकाने ताब्यात घेतल्याची कारवाई गुरुवारी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास मजरे ते वाघळी रोडवरील वाघळी चौफुलीजवळ करण्यात आली.

    मिळालेल्या माहितीनुसार,  वाघडली येथील प्रेमराज उर्फ मंगेश शिवाजी सोनवणे (वय २०) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पो.हे.कॉ. संदीप पाटील यांनी फिर्याद दिली आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथक स.पो.नि. विजय माळी यांच्या नेतृत्वात विभागीय गस्त घालत होते. पथकात पो.हे.कॉ.संदीप पाटील, पो.कॉ. विजय पाटील व चालक पो.कॉ. नितीन कोळी यांचा समावेश होता. गस्तीदरम्यान गुरुवारी पहाटे ३.३० वाजता पथकाचे वाहन मजरे ते वाघळी रोडने जात असताना वाघळी चौफुलीजवळ अंधारात एक तरुण तोंडाला रुमाल बांधून संशयास्पदरित्या बसलेला आढळला.

    पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले. या वेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. प्रेमराज सोनवणे याची अंगझडती घेण्यात आली. या वेळी त्याच्याकडून २ हजाराचा मोटरोला कंपनीचा मोबाईल, सुमारे २ हजाराचा विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण ४ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रेमराज सोनवणे याच्याविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात कारवाई केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावात ‘साधू’ बनून भामट्यांचा धुमाकूळ : वृद्धाची ७० हजारांची अंगठी लंपास !

    September 11, 2026

    बस-पिकअपच्या भीषण धडकेत चालकाचा मृत्यू; दोघे गंभीर

    September 11, 2026

    १८ वर्षीय तरुणाच्या खुनाने पारोळा हादरले ; संशयित आरोपी फरार

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.