Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कुलूप तोडून चोरट्यांचा हात साफ : दोन घरांत चोरी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!
    क्राईम

    कुलूप तोडून चोरट्यांचा हात साफ : दोन घरांत चोरी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

    editor deskBy editor deskOctober 31, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    फैजपूर : प्रतिनिधी 

    शहरातील लक्ष्मीनगर परिसरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे याच परिसरातील शेजारी राहणाऱ्या अशोक वासुदेव पाटील यांच्या घराचेही कुलूप तोडून चोरी करण्यात आल्याची तक्रार समोर आली आहे.

    याबाबत मिळालेल्या तक्रारीनुसार, धनराज मनोहर बडगुजर (वय ३३) यांच्या कुटुंबातील सदस्य बाहेरगावी गेलेले असताना घर बंद होते. दि २९ रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून ते बाहेर गेले होते. दरम्यान, दि. ३० रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या नातेवाईक कोमल हिला घराचे कुलूप तोडलेले व घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले.

    तिने तत्काळ फोनद्वारे याबाबत माहिती दिल्यानंतर घरमालकांनी फैजपूर येथे धाव घेतली. सकाळी दहा वाजेच्या सुमारास घरी पोहोचल्यानंतर घरातील कपाटाचे कुलूप तोडून त्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. तक्रारीत नमूद केल्यानुसार, चोरट्यांनी १० ग्रॅम, ५ ग्रॅम व ७ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या, २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप, १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडंट, ५ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी तसेच कपाटात ठेवलेली अंदाजे १ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याचे म्हटले आहे. याच परिसरातील अशोक वासुदेव पाटील यांच्या घराचेही कुलूप तोडण्यात आले असून, त्यांच्या घरातून १० हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकारामुळे लक्ष्‌मीनगर परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, बंद घरांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. याप्रकरणी दि. ३० रोजी फैजपूर पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी करून चोरट्यांचा शोध घ्यावा व चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळवून द्यावा, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. यावेळी घटनास्थळी स पो नी संदीप पाटील पोलिस उपनिरीक्षक नीरज बोकील, हे. कॉ. ज्ञानेश्वर चौधरी, हमीद तडवी, राहुल नावकर यांनी भेट दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ज्ञानेश्वर महाजन आणि रत्नाबाई जाधव मैदानात; दोन मतदारसंघांत उमेदवारी अर्ज दाखल!

    October 31, 2026

    शिवीगाळ, मारहाण अन् उपाशी ठेवण्याचा आरोप; दहिदुलेतील विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

    October 31, 2026

    जिल्हा बँक निवडणुकीसाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल !

    October 31, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.