Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चामुंडा माता मंदिराचे कुलूप तोडून दानपेटीतील रोकड, सोन्याचे दागिने लंपास
    क्राईम

    चामुंडा माता मंदिराचे कुलूप तोडून दानपेटीतील रोकड, सोन्याचे दागिने लंपास

    editor deskBy editor deskAugust 30, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर :  प्रतिनिधी 

    शहरातील मातोश्री नगर परिसरातील श्री चामुंडा माता मंदिरात २८ रोजी रात्री चोरट्यांनी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या पाच दिवसांत मातोश्री नगर परिसरात दुसऱ्यांदा चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

    चामुंडा माता मंदिराच्या दरवाजाचे २८ रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी लॉक तोडून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर मंदिरातील कपाट फोडून त्यातील ऐवज चोरी केला. तसेच माते मूर्तीवरील सोन्याच्या टिकल्या, बांगड्या तसेच दानपेटीतील रोकड चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले आहे. चोरट्यांनी मंदिरातील कपाटे व इतर साहित्याचीही नासधूस केली आहे.

    सकाळी मंदिरात चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. या घटनेमुळे मातोश्री नगर परिसरात खळबळ उडाली असून, सलग चोरीच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पंक्चर झालेली ओमनी रस्त्याच्या कडेला सोडली अन् चोरट्यांनी डाव साधला!

    August 30, 2026

    सीसीटीव्हीच्या आधारे दोन चोरटे जेरबंद; अल्पवयीन मुलाचाही सहभाग उघड !

    August 30, 2026

    “विकासकामांसाठी दोन शिव्या खायची तयारी ठेवा”; फडणवीसांचा अधिकाऱ्यांना कानमंत्र

    August 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.