Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » “विकासकामांसाठी दोन शिव्या खायची तयारी ठेवा”; फडणवीसांचा अधिकाऱ्यांना कानमंत्र
    जळगाव

    “विकासकामांसाठी दोन शिव्या खायची तयारी ठेवा”; फडणवीसांचा अधिकाऱ्यांना कानमंत्र

    editor deskBy editor deskAugust 29, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : वृत्तसंस्था 

    आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू असलेल्या हजारो कोटींच्या विकासकामांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. एकाच वेळी शहरात अनेक विकासकामे सुरू असल्याने नाशिककरांना सध्या मोठा त्रास सहन करावा लागत आहे आणि त्यामुळे आम्हाला लोकांच्या शिव्याही खाव्या लागत आहेत, अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली. मात्र, ही सर्व कामे पूर्ण झाल्यावर हेच लोक आपल्याला फुलांचे हार घालतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच, कुंभमेळ्यातील कामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करणारे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही त्यांनी जोरदार पलटवार केला. नाशिकमध्ये आयोजित ‘सिंहस्थ महा कुंभ भक्ती संगम’ कार्यक्रमात ते बोलत होते.

    नाशिकमध्ये सुरू असलेल्या कामांमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “सध्या एकाच वेळी रस्त्यांची कामे, रिंगरोड आणि रुंदीकरण सुरू असल्याने नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या लोकांना त्रास होतोय. त्यामुळे लोकांच्या शिव्या आम्हाला खाव्या लागतात. गिरीश महाजन आणि दादा भुसे इथेच राहत असल्याने त्यांना तर जास्त शिव्या खाव्या लागतात.”

    “कोणतेही मोठे परिवर्तन करताना सुरुवातीला शिव्या खाव्याच लागतात. पण ज्या दिवशी ही कामे पूर्ण होतील, त्र्यंबकेश्वरचा कॉरिडॉर उभा राहील, तेव्हा हेच लोक आपल्याला फुलांचे हार घालतील आणि आपली तारीफ करतील. त्यामुळे अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी दोन शिव्या खायची तयारी ठेवावी; फक्त आपले काम जनहिताचे आणि पारदर्शक असले पाहिजे.”

    “काही लोक विचारतात की कुंभमेळ्यावर ३४ हजार कोटी रुपये का खर्च करताय? त्यांना हे समजत नाही की यातील ९० टक्के निधी हा कायमस्वरूपी व्यवस्थांवर खर्च होत आहे. यातून पुढच्या ५० वर्षांसाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये आधुनिक सुविधा निर्माण होणार आहेत.” “दर 12 वर्षांनी कुंभमेळ्यावेळी साधुग्रामसाठी जागांचा प्रश्न निर्माण होतो. जर आता या जागा अधिग्रहित केल्या नाहीत, तर भविष्यात कुंभमेळा कुठे करायचा हा प्रश्न उभा राहील. म्हणूनच अडीच हजार कोटी रुपये खर्च करून साधुग्रामच्या जागा कायमस्वरूपी अधिग्रहित करण्याचा मोठा निर्णय आम्ही घेतला आहे.”

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    एरंडोलात खळबळ ; खडकेच्या पिता-पुत्रावर नर्मदेचे संकट; मुलाला वाचवताना वडिलांचाही बळी

    August 29, 2026

    बहिणीला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्याचे स्टेटस ठेवत भावाने घेतला टोकाचा निर्णय !

    August 29, 2026

    रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सोने-चांदी स्वस्त; जळगावच्या सुवर्ण बाजारात ग्राहकांना मोठा दिलासा!

    August 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.