Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बहिणीला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्याचे स्टेटस ठेवत भावाने घेतला टोकाचा निर्णय !
    क्राईम

    बहिणीला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्याचे स्टेटस ठेवत भावाने घेतला टोकाचा निर्णय !

    editor deskBy editor deskAugust 29, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    आई माहेरी भावाला तर वडील त्यांच्या बहिणीच्या घरी राखी बांधण्यासाठी गेलेले असताना रोहित साहेबराव धनगर (१७, रा. दशरथनगर) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (२८ ऑगस्ट) दुपारी घडली. बहिणीला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्याचे स्टेटस व मित्रांना मेसेज पाठवून रोहितने ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी जीवन संपविले. ऑनलाइन गेममध्ये पैसे गमावल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.

    वडील साहेबराव धनगर हे रोहित व मुलीला घेऊन मेहरुण परिसरात बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेले होते. तेथून रोहित हा एकटाच घरी आला व त्याने गळफास घेतला. रोहित याने घरी आल्यानंतर मित्रांना मेसेजद्वारे आत्महत्या करत असल्याचे कळविले. ते मेसेज पाहून मित्रांनी त्याच्या घरी धाव घेतली. मात्र तोपर्यंत त्याने गळफास घेतलेला होता. शनिपेठ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अभिषेक कट्यारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रोहितला जीएमसीत दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

    रोहित हा वडिलांसोबत त्याच्या आत्याकडे गेलेला असताना तेथे त्याने बहिणीकडून राखी बांधून घेतली. त्यानंतर तो घरी परतला व जीवन संपविले. त्याची ही शेवटची राखी ठरली. गळफास घेण्यापूर्वी त्याने बहिणीसाठी स्टेटसही ठेवले. त्यात त्याने ‘हॅपी रक्षाबंधन ताई, आता सगळं तू सांभाळून घे दीदी. मम्मी, पप्पांना कधी एकटे सोडू नको, मी जातो आहे’ असा उल्लेख केला. या सोबतच काही हिंदी ओळींचा व्हिडिओदेखील स्टेटसवर ठेवला. ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेने लहान बहिणीसह संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    एरंडोलात खळबळ ; खडकेच्या पिता-पुत्रावर नर्मदेचे संकट; मुलाला वाचवताना वडिलांचाही बळी

    August 29, 2026

    रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सोने-चांदी स्वस्त; जळगावच्या सुवर्ण बाजारात ग्राहकांना मोठा दिलासा!

    August 29, 2026

    सावदा पोलिसांचा गुटख्यावर ‘सर्जिकल स्ट्राईक’; १०.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त!

    August 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.