Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पोलिसांचा ‘एमपीडीए’चा धडाका ; चाळीसगावच्या वाजिद खानची नागपूर कारागृहात रवानगी !
    क्राईम

    पोलिसांचा ‘एमपीडीए’चा धडाका ; चाळीसगावच्या वाजिद खानची नागपूर कारागृहात रवानगी !

    editor deskBy editor deskAugust 27, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जळगाव पोलिसांनी समाजात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका सुरू केला आहे. महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधद्रव्य विषयक गुन्हेगार तसेच धोकादायक व्यक्तींविरुद्धच्या एमपीडीए कायद्यांतर्गत जळगाव जिल्ह्यातील ९ गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाजिद खान साबीर खान (वय २९, रा. नागदरोड, चाळीसगाव) याच्यावर करण्यात आलेल्या कारवाईचा समावेश आहे.

    पोलिसांच्या माहितीनुसार, वाजिद खान याच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात विविध स्वरूपाचे एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खुनाचा प्रयत्न, विनयभंग, गंभीर दुखापत, दुखापत तसेच गैरकायदा मंडळी जमवून दहशत निर्माण करण्यासारख्या स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश असल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

    वाजिद खान याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा विचार करून त्याच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवायाही करण्यात आल्या होत्या. मात्र, त्याच्या वर्तनात अपेक्षित सुधारणा न झाल्याने पुन्हा गुन्हे करण्याची प्रवृत्ती कायम असल्याचे पोलिसांच्या प्रस्तावात नमूद करण्यात आले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला.

    चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. अमित मनेळ यांनी हा प्रस्ताव तयार करून तो वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा प्रशासनाकडे सादर केला. हा प्रस्ताव २२ जून २०२६ रोजी सादर करण्यात आला होता. प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी २६ ऑगस्ट २०२६ रोजी वाजिद खान याला एमपीडीए कायद्यान्वये नागपूर येथील कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित केला.

    या आदेशानुसार चाळीसगाव शहर पोलिसांनी २७ ऑगस्ट २०२६ रोजी वाजिद खान याला ताब्यात घेऊन नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. आगामी सण-उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींवर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. समाजात दहशत निर्माण करणाऱ्या तसेच वारंवार गुन्हे करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा इशारा या कारवाईतून पोलिसांनी दिला आहे.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.  आगामी सण-उत्सवांच्या काळात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अशा प्रकारच्या प्रतिबंधात्मक कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आधी मुलगा बुडाला… वाचवायला गेलेले वडीलही बुडाले! अमळनेर तालुक्यातील हृदयद्रावक घटना

    August 27, 2026

    अल्पवयीन मुलीचा पाठलाग, ; आरोपीला न्यायालयाचा दणका, ६ महिने सश्रम कारावास!

    August 27, 2026

    ट्रकच्या धडकेत २८ वर्षीय तरुण ठार, दीड वर्षाच्या चिमुकल्याने गमावला वडिलांचा आधार!

    August 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.