Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अल्पवयीन मुलीचा पाठलाग, ; आरोपीला न्यायालयाचा दणका, ६ महिने सश्रम कारावास!
    क्राईम

    अल्पवयीन मुलीचा पाठलाग, ; आरोपीला न्यायालयाचा दणका, ६ महिने सश्रम कारावास!

    editor deskBy editor deskAugust 27, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून त्रास देण्यासह तिच्या आईला शिवीगाळ करत धमकी देणाऱ्या धनराज गजानन कोळी याला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. बनकर यांनी ६ महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

    मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीच्या घरासमोर येऊन धनराज कोळी याने २१ ऑक्टोबर २०१८ रोजी मुलीला बाहेर बोलवत ‘तू माझ्या सोबत प्रेमसंबंध ठेव’ असे म्हणाला होता. त्या वेळी मुलीची आई घरा बाहेर आली असता तिला शिवीगाळ करत ‘तुझ्या मुलीला आम्ही उचलून घेऊन जाऊ, तू आमचे काहीही करू शकत नाही. आमच्या नांदी लागली तर तुला व्यवस्थित जगू देणार नाही’ अशी धमकी दिली होती. या घटनेपूर्वीही मुलगी शाळेत जात असताना धनराज हा तिचा वेळोवेळी पाठलाग करत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून मुलीच्या आई-वडिलांनी तिचे शाळेत जाणे बंद केले होते.

    या प्रकरणी मुलीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे ५ साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता व विशेष सरकारी वकील चारुलता बोरसे यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी अमोल पाटील यांनी मदत केली. सरकार पक्षाचा पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने धनराज याला पोक्सो कलमान्वये ६ महिने सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड, शांतताभंग केल्याप्रकरणी (भादंवि कलम ५०४) ३ महिने सश्रम कारावास, धमकी दिल्याप्रकरणी (भादंवि कलम ५०६) ३ महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ट्रकच्या धडकेत २८ वर्षीय तरुण ठार, दीड वर्षाच्या चिमुकल्याने गमावला वडिलांचा आधार!

    August 27, 2026

    चिमुकल्याच्या अपघाती मृत्यूनंतर संतापाचा भडका; वाहन पेटवले, पोलिसांच्या कामात अडथळा १० जणांवर गुन्हा

    August 27, 2026

    भरधाव पिकअपने दुचाकीला उडवले; तरुण जागीच ठार, मित्र गंभीर जखमी

    August 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.